Rakhi Sawant’s rant about Pakistan; MNS and netizens aggressive over viral video : बॉलिवूडची ड्रामाक्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत नेहमीच कोणता ना कोणता नवा ड्रामा करत असते त्यातूनच ती अनेकदा अडचणीत देखील येते. असंच एक धक्कादायक वक्तव्य राखीने केलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्यावर नेटकरांकडून संताप व्यक्त होतोय. तसेच राजकीय पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या व्हिडिओवरून राखी सावंतला थेट महाराष्ट्रातून हाकलून देण्याचं देण्यात यावा असं म्हटलं आहे.
काय आहे हा व्हिडीओ?
एका व्हायरल व्हिडिओमध्ये राखी सावंत प्रतिज्ञा घेत आहे. त्यावेळी ती म्हणते की, मी राखी सावंत आहे. मी खरं बोलेन. खऱ्या शिवाय काहीही बोलणार नाही. पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्यासोबत आहे. जय पाकिस्तान. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिसतानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. नेटकऱ्यांकडून तसेच अनेक राजकीय नेत्यांकडून देखील तिच्या या व्हिडिओवर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या अगोदर देखील ज्यावेळी पाकिस्तानातून आलेल्या नागरिकांना भारताने व्हिसा रद्द करत परत पाठवले. त्यावेळी सीमा हैदर ही भारताची सून असून तिला भारतात राहू दिलं जावं. असं म्हणत तिला राखीने पाठिंबा दिला होता.
तर नेटकऱ्यांसह राखीच्या या व्हिडिओवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडून देखील आक्रमक प्रतिक्रिया समोर आली. मनसे कार्यकर्ते अनिश खंडागळे यांनी या व्हिडिओवर म्हटलं आहे की, व्हायरल व्हिडिओमध्ये या बाई काय म्हणतात? ज्या देशाचं आपण नाव घेऊ इच्छित नाही. त्याचा त्या उदो-उदो करत आहेत. त्यामुळे त्यांचा जाहीर निषेध. तसेच ज्या देशात भारतात राहिल्या प्रेक्षकांच्या जीवावर नाव कमावलं, पैसा कमावला आणि उदो उदो पाकिस्तानचा करतायेत. त्यामुळे अशा व्यक्तीला भारतातून हाकलून दिले पाहिजे.
पाकिस्तानकडून भारतावर सायबर हल्ला, संरक्षणाशी संबंधित वेबसाइट हॅक, गोपनीय माहिती लीक
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध देशभरात संतापाची (Pahalgam Terror Attack) लाट उसळली आहे. याच दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज (Rajnath Singh) दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला कठोर शब्दांत इशारा दिला आहे. देशाकडे वाईट नजरेनं पाहणाऱ्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल. भारतीय सैनिकांच्या साथीने देशाच्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करणं ही संरक्षणमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कार्यकाळात तुम्हाला जे वाटतं तसं निश्चित होईल, असे राजनाथ सिंह म्हणाले.
अजितदादा काय आकाशातून पैसे आणणार आहे का? हसन मुश्रीफांनी संजय शिरसाटांना चांगलंच सुनावलं
राजनाथ सिंह पुढे म्हणाले, देशातील लोकांना जसं वाटतं त्याच भाषेत पंतप्रधान मोदी शत्रूला उत्तर देतील. पीएम मोदींच्या नेतृत्वात तुम्हाला जसे वाटेल तसेच घडणार. आपल्या पंतप्रधानांना तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता. त्यांच्या कार्यशैलीशी परिचित आहात. जोखीम स्वीकारण्याचं त्यांचं कौशल्यही तुम्हाला माहिती आहे. देशाच्या विरोधात जे असतील त्यांना उत्तर देण्याचं काम ते करतील.