अजितदादा काय आकाशातून पैसे आणणार आहे का? हसन मुश्रीफांनी संजय शिरसाटांना चांगलंच सुनावलं

अजितदादा काय आकाशातून पैसे आणणार आहे का? हसन मुश्रीफांनी संजय शिरसाटांना चांगलंच सुनावलं

Hasan Mushrif Criticize Sanjay Shirsat Statement On Ladki Bahin Yojana : राज्यात महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ (Ladki Bahin Yojana) चांगलीच चर्चेत आहे. पण हीच योजना आता सरकारसाठी अडचण ठरत असल्याचं दिसतंय. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी (Sanjay Shirsat) जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. यावर आता वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी (Hasan Mushrif) उत्तर दिलंय.

अजित पवार यांची मुख्यमंत्रि‍पदाची इच्छा यावर बोलताना हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय की, आपला नेता पुढे जावा असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं. वस्तुस्थिती ज्यावेळेस प्रत्यक्षात येईल, त्यावेळेसच या गोष्टी घडणार आहेत.

तर माझी मंत्रिपदावरून हकालपट्टी करा…शिरसाट अजितदादांच्या खात्यावर चिडले !

हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय की, संजय शिरसाट यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. ते माझे चांगले मित्र आहेत, मात्र ते नव्याने मंत्री झाले आहेत. ज्यावेळेस ही घटना घडली, असं त्यांना वाटलं तेव्हा वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी बसायला हवं होतं. वस्तुस्थिती त्यांनी समजून घ्यायला हवी आहे. यातून जर त्यांचं समाधान झालं नाही, तर ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकले असते.

कोणतीही माहिती न घेता प्रसार माध्यमांसमोर येणं आणि आपल्याच ज्येष्ठ नेत्याला अशी उपमा देणं, हे अयोग्य आहे. अजितदादा काय आकाशातून पैसे आणणार आहेत का? हे पैसे अजितदादांनी घरी नेले नाहीत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच ही लाडकी बहीण योजना यशस्वी झाली आहे. याचा आवाका इतका मोठा आहे की, पैसे देताना ओढाताण होत आहे. आपण सर्वांनी मिळून दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी हे पैसे वापरले असतील, तर यात अशा उपमा वापरणं बरोबर नाही. असे विधान करण्यापूर्वी आधी आपण शहानिशा करायला पाहिजे, असा माझा संजय शिरसाठ यांना सल्ला आहे असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय.

अण्णाभाऊ साठेंच्या लेकीचे निधन; शांताबाई साठेंनी वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महायुतीच्या 236 जागा निवडून आल्या आहेत. विरोधकांच्या फार कमी आहेत. आता अनेकजण सत्ताधारी पक्षासोबत येण्यासाठी इच्छुक आहेत, विरोधी पक्षाचे लोक आमच्याकडे येण्यासाठी चढाओढ लागली आहे, हे खरं असल्याचं देखील हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. संजय राऊतांच्या वक्तव्यावर हसन मुश्रीफ यांनी विचारलं, सत्तेत असताना भाजप आमदार का फोडतील? मविआबद्दल तिन्ही पक्षांमध्ये सत्ता नसल्याने तेथील आमदार हवालदिल झाल्याचे दिसत आहेत.

अजित पवारांनी कर्जमाफी करणार नाही, असं म्हटलेलं नाही. योग्य वेळेला कर्जमाफी होणार आणि योग्य वेळेलाच 2100 रुपये लाडक्या बहिणींला देणार असं देखील मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube