पाकिस्तानकडून भारतावर सायबर हल्ला, संरक्षणाशी संबंधित वेबसाइट हॅक, गोपनीय माहिती लीक

पाकिस्तानकडून भारतावर सायबर हल्ला, संरक्षणाशी संबंधित वेबसाइट हॅक, गोपनीय माहिती लीक

Cyber ​​attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने (India) पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर आता पाकिस्तानने भारतावर सायबर हल्ले करायला सुरूवात केल्याची माहिती समोर आली. पाकिस्तानी हॅकर्सनी भारतावर सायबर हल्ल्याचा (Cyber ​​attack) प्रयत्न केला आहे. भारतातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक वेबसाइट हॅ झाल्याचा दावा पाकिस्तान सायबर फोर्स या ट्विटर हँडलवरून करण्यात आला.

अजितदादा काय आकाशातून पैसे आणणार आहे का? हसन मुश्रीफांनी संजय शिरसाटांना चांगलंच सुनावलं 

या गटाने भारतीय संरक्षण संस्थांचा संवेदनशील डेटा हॅक केल्याचा दावा केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्करी अभियांत्रिकी सेवा आणि मनोहर पर्रिकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्था (IDSA) यांच्याशी संबंधित महत्त्वाची माहिती लीक झाली आहे. यामध्ये संरक्षण क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती आणि लॉगिन क्रेडेन्शियल्सचा समावेश आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी हॅकर्सनी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पीएसयू आर्मर्ड व्हेईकल कॉर्पोरेशन लिमिटेडची वेबसाइटही हॅक केली आहे. या वेबसाइटवर पाकिस्तानी ध्वज आणि अल खालिद टँकचे फोटो पोस्ट करण्यात आले होते. त्यानंतर आता खबरदारी म्हणून ही वेबसाइट तात्पुरती ऑफलाइन करण्यात आली आहे
आणि तिचे सायबर ऑडिट सुरू करण्यात आले आहे.

युद्ध झालं तर पाकिस्तानवर येईल भीक मागायची वेळ; मूडीजच्या रिपोर्टमध्ये मोठे खुलासे 

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या तीन दिवसांनंतर, २५ एप्रिल रोजी भारतातील आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंगची वेबसाइट हॅक झाल्याची माहिती समोर आली होती.

दरम्यान, या सायबर हल्ल्यानंतर भारतीय सायबर सुरक्षा संस्था सतर्क झाल्या आहेत. सायबर सुरक्षा एजन्सी पाकिस्तानकडून होणाऱ्या संभाव्य सायबर हल्ल्यांवर लक्ष ठेवून आहेत. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर, डिजिटल सुरक्षा वाढविण्यात येत आहे आणि असे हल्ले पुन्हा होऊ नयेत यासाठी पावले उचलली जात आहेत.

पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्या
दरम्यान, दुसरीकडे भारत हल्ला करू शकतो, या भीतीनं पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली वाढल्या. पाकिस्तानने पीओकेमधील रावलकोटमध्ये सैन्याच्या हालचाली वाढवल्या आहेत. मोठ्या संख्येने सैन्य तैनात करण्यात आलं. मात्र, पाकिस्तानला आता त्यांच्याच देशातून विरोध होत आहे, हे धर्मयुद्ध नाही, दोन देशांमधील युद्ध आहे, म्हणून सरकार हे युद्ध लढेल. नागरिकांनी या युध्दात पडू नये, असं आवाहन पाकिस्तानच्या लाल मशिदीमधील मौलवींनी केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube