युद्ध झालं तर पाकिस्तानवर येईल भीक मागायची वेळ; मूडीजच्या रिपोर्टमध्ये मोठे खुलासे

युद्ध झालं तर पाकिस्तानवर येईल भीक मागायची वेळ; मूडीजच्या रिपोर्टमध्ये मोठे खुलासे

Pakistan will have to beg after War Moody’s report makes big revelations : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात २६ जणांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात आता मूडीज रेटींग्जच्या रिपोर्टमध्ये मोठे खुलासे करण्यात आले आहेत. त्यानुसार जर भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास पाकिस्तानला मोठं नुकसान सहन करावं लागेल. त्यांची अर्थव्यवस्था ढासळलेल. यासह अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत.

मूडीजच्या रिपोर्टमध्ये काय म्हटले आहे?

मूडीजने इशारा दिला आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा पाकिस्तानला मिळणाऱ्या बाहेरील फडींगवर विपरित परिणाम करू शकतो. तसेच त्यांना सध्याच्या फॉरेन एक्सचेन्ज रीझर्व्हमध्ये इतर देशांचे कर्ज देखील फेडता येणार नाही. त्यामुळे त्यांना आयएमएफ या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून देखील मदद मिळवणे कठीण होऊन जाईल.

अर्थ खात्यामध्ये काही महाभाग बसले…संजय शिरसाट अजितदादांच्या खात्यावर प्रचंड चिडले !

दरम्यान सध्या पाकिस्तानमध्ये सुधारणा देखील दिसत आहे. महागाई कमी होत आहे, हळू-हळू जीडीपी वाढत आहे. आयएमएफच्या सूचनांच्या पालनातून थोडा दिलासा मिळत आहे. मात्र भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढला तर ही परिस्थिती देखील हाता बाहेर जाऊ शकते.

नीट काम करा, नाहीतर तुमच्या जागी रोबोट दिसेल; अजितदादांनी टोचले कर्मचाऱ्यांचे कान

तर भारताबद्दल सांगायचं झालं तर भारताची अर्थव्यवस्था तेजीने विकसित होत आहे. भारताचा जीडीपी रेट स्थिर आहे. सरकारी गुंतवणूक वाढत आहे. देशांतर्गत बाजारात उपभोक्ते देखील आहेत. तसेच भारत पाकिस्तानमध्ये व्यापार 0.5 टक्क्यांहूनही कमी असल्याने त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम होताना दिसत नाही. मात्र भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढला तर भारताला संरक्षणावर आणखी जास्त खर्च करावे लागेल. त्यामुळे भारतावर अर्थिक भार वाढेल. पण एकंदरीत भारतावर फार काही परिणाम होणार नाही.

अण्णाभाऊ साठेंच्या लेकीचे निधन; शांताबाई साठेंनी वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने आर्थिक आणि कुटनितीवर भर दिला आहे. पाकिस्तानला सर्व बाजूने घेरले आहे. डाक सेवा आणि पार्सल सेवा स्थगित केली आहे. पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांवर प्रवेश मनाई केली आहे. तर भारतीय जहाजांना देखील पाकिस्तानी पोर्ट्सवर जाण्याची परवानगी नाही. त्याचबरोबर सिंधु नदी करार स्थगित केला आहे. त्यामुळे पाकवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच एअरलाईन्स आणि एअरस्पेसवर देखील निर्बंध लादले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube