Download App

रक्षाबंधनाला भावंडांच्या प्रेमाचं सेलिब्रेशन! ‘बहन का ड्रामा, भाई का स्वॅग’, स्टार प्लसवर रंगणार धम्माल सोहळा…

Star Parivar Behan Ka Drama Bhai Ka Swag : टीव्हीच्या पडद्यावर सांस्कृतिक क्षण उलगाडणाऱ्या, स्टार प्लस (Star Plus) या वाहिनीने भारतीय सण भव्यतेने आणि भावनेचा स्पर्श देऊन साजरे करण्याची आपली परंपरा चालू ठेवली आहे. यंदा रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan) निमित्ताने ही वाहिनी ‘स्टार परिवार – बहन का ड्रामा, भाई का स्वॅग’ नावाने एक मनोरंजक चमकदार प्रहसन सादर करणार (Entertainment News) आहे, ज्यामध्ये नाट्य, डान्स आणि भावंडांच्या प्रेमाची भावना ओतप्रोत असेल.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या या प्रोमोमध्ये स्टार कलाकारांनी नटलेल्या या प्रहसनाची झलक बघायला मिळत आहे. या रजनीची होस्ट आहे अनुपमा. यात ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील अरमान आणि ‘अनुपमा’ मधील प्रेम यांच्यात एक अनपेक्षित (Star Parivar Behan Ka Drama Bhai Ka Swag) आणि जोरदार टक्कर होणार आहे. हे दोन्ही कलाकार आपल्या दमदार परफॉर्मन्सने मंच दणाणून सोडतील आणि झनकचा भाऊ बनण्याचा सन्मान मिळवण्यासाठी कटिबद्ध दिसतील.

कुणी राहत असलं तर कसं बाहेर काढणार?, धनंजय मुंडेंना बंगला सुटेना, भुजबळांना बंगला मिळेना..

रक्षाबंधनाच्या वातावरणात भाऊ असण्याची जी गौरवपूर्ण भावना असते, त्याच्या अनुरोधाने या दृश्याचे सर्जन कलात्मकतेने करण्यात आले आहे. नाट्यमयता आणि जोरदार कोरिओग्राफीसह हे दोघे स्पर्धक या परफॉर्मन्समध्ये आपली खास शैली आणि आपले अनोखे व्यक्तिमत्व घेऊन येतील. हा अॅक्ट पाहताना एक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उद्भवेल की, झनकचा भाऊ म्हणून सरतेशेवटी कुणाची निवड होणार? गंमतीशीर कथानकातील खेळकर चढाओढ आणि अनपेक्षित कलाटण्या प्रेक्षकांची उत्कंठा वाढवतील.

Sanskruti Balgude : संस्कृतीचं पिस्ता रंगाच्या साडीमध्ये खुललं सौंदर्य, चाहते फिदा…

या रक्षाबंधन विशेष कार्यक्रमात रक्षाबंधन या सणात अभिप्रेत असलेली भावनिक नाती, जोशात केलेली स्पर्धा आणि भावपूर्ण आनंद सोहळा यांचे सुंदर मिश्रण बघायला मिळेल आणि ते देखील स्टार प्लसच्या कथाविश्वातील सुपरिचित कलाकारांच्या सान्निध्यात!

पहात रहा, ‘स्टार परिवार बहन का ड्रामा, भाई का स्वॅग’ 9 ऑगस्टला रात्री 7 वाजता, केवळ स्टार प्लसवर.

 

follow us