कुणी राहत असलं तर कसं बाहेर काढणार?, धनंजय मुंडेंना बंगला सुटेना, भुजबळांना बंगला मिळेना..

कुणी राहत असलं तर कसं बाहेर काढणार?, धनंजय मुंडेंना बंगला सुटेना, भुजबळांना बंगला मिळेना..

Chhagan Bhujbal on Dhananjay Munde Bungalow : धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा (Munde) देऊन चार महिने उलटले तरी मलबार हिल येथील सातपुडा हा शासकीय बंगला अद्याप सोडलेला नाही. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ या बंगल्याच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया देताना, घर खाली झालं नाही तर मुख्यमंत्री फडणवीस यांना एखादं छोटं मोठं घर असेल तर ते द्या, असे सांगणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर धनंजय मुंडे यांना सातपुडा बंगला देण्यात आला होता. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर १५ दिवसांच्या आत सरकारी बंगला रिकामा करणं बंधनकारक असतं. परंतु, धनंजय मुंडे यांनी ४ मार्च रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानुसार त्यांनी २० मार्चपर्यंत बंगला सोडणं अपेक्षित होतं. पण त्यांनी मुदतवाढ मागून अद्याप बंगला रिकामा केलेला नाही.

लाखोंचा दंड पण बंगला सुटेना; मंत्रिपद चार महिन्यांपुर्वीच गेले बंगला धनंजय मुंडेंकडेच, भुजबळांची प्रतिक्षा कायम

दरम्यान, मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांना सातपुडा बंगला देण्याचा शासकीय आदेश २३ मे रोजी काढण्यात आला. पण अद्याप धनंजय मुंडे यांना बंगला रिकामी करण्याची कोणतीही नोटीस पाठवण्यात आलेली नाही. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, मी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. सामान्य प्रशासन विभाग मंत्र्यांची ऑफिसेस कुठं असावीत आणि निवासस्थानं कुठे असावीत या संदर्भातली व्यवस्था पाहत असते. त्यांनी मला पंधरा दिवसांनी पत्र दिलं की, तुमच्यासाठी अमुक-अमुक निवासस्थान देण्यात आलेले आहे. याचा अर्थ तुम्ही तिथे राहायला जावं.

आता राहायला जायचं म्हटल्यावर एखादं घर खाली असेल तरच आपण राहायला जाऊ शकतो. तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय बाहेर काढणार? त्यातही ते आमचे सहकारी आहे. मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा बोललेलो नाही. आता मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्यावर चर्चा करतील. ते काय निर्णय घेतील? याची मला काही कल्पना नाही असंही भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube