Ram Gopal Varma : निर्माते, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma ) हे त्यांच्या सिनेमाबरोबरच वादग्रस्त वक्तव्यांमुळे (Controversial statement) कायम चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाबाबत काही ट्विट्स केले आहेत. ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Stor) हा सिनेमा रिलीज होण्याअगोदरच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सिनेमा प्रदर्शित होताच काही लोकांनी त्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली. राजकीय संघटनांकडून या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी देखील घालण्याची मागणी करण्यात आली होती.
We are so comfortable in telling lies to both others and ourselves that when someone goes ahead and shows the truth we get SHOCKED..That explains the DEATH like SILENCE of BOLLYWOOD on the SHATTERING SUCCESS of #KeralaStory
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 21, 2023
सिनेमाची कथा धर्मांतर केलेल्या चार महिलांची आहे. ज्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील करण्यात येते. एकीकडे काही लोक या सिनेमाला मोठा विरोध करत आहेत, तर दुसरीकडे या सिनेमाला मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. एकही स्टार नसलेला हा सिनेमा २०० कोटींच्या कमाईचा टप्पा लवकरच पार करणार आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या वेळी ३२ हजार मुली या आकड्यावरून मोठा गदारोळ झाला होता.
बऱ्याच लोकांनी या सिनेमाची मोठी प्रशंसा केली, तर काही बॉलिवूड कलाकारांनी यावार भाष्य देखील केले नाही. बॉलिवूडच्या एकंदरच या स्वभावावर नुकतंच दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मोठं भाष्य केले आहे. याबद्दल ट्वीट करत त्यांनी म्हणाले आहे की आपण एखादी खोटी गोष्ट लोकांना आणि स्वतःला सांगण्यात इतके सराईत झालो असतो की, जेव्हा त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन कुणी आपल्याला सत्य सांगतं तेव्हा मात्र आपल्याला धक्काच बसतो.
Kushal Badrike: ‘तू परत येशील तेव्हा…’ अमेरिकेला निघालेल्या बायकोसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट
‘द केरला स्टोरी’च्या अभूतपूर्व यशानंतर बॉलिवूडमध्ये एक मोठी शांतता पसरलेली आहे ही यावरून स्पष्ट होतं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. राम गोपाल वर्मा हे त्यांच्या अशाच स्पष्टवक्तेपणासाठी सतत चर्चेत असतात. ‘द केरला स्टोरी’ सिनेमाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. यामध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी, सिद्धी इदनानी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत असून लवकरच २०० कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.