Download App

Ram Mandir सोहळ्यात गाजला ज्युबिन नौटियाल, ‘मेरे घर राम आये हैं’ ने घेतला भाविकांच्या मनाचा ठाव

Ram Mandir : अयोध्येत सोमवारी (दि.22) मोठ्या आनंदात रामाची प्राणप्रतिष्ठापना (Ram Mandir) करण्यात आली. त्यादरम्यान सोशल मिडीयावर अद्याप देखील राममय वातावरण झालेलं आहे. त्यात टी-सिरीजने निर्मिती केलेलं आणि गायक ज्युबिन नौटियाल याने गायलेलं ‘मेरे घर राम आये हैं’ या गाण्याने भाविकांच्या मनाचा ठाव घेतला.

Manoj Jarange : ‘आम्ही मुंबई बंद पाडायला चाललो नाही तर’.. जरांगेंचे सरकारला रोखठोक प्रत्युत्तर

Jubin Nautiyal: Mere Ghar Ram Aaye Hain | Payal Dev | Manoj Muntashir, Dipika C, Lovesh N |Bhushan K

या गाण्याने लाखो रसिकांच्या आणि भाविकांच्या मनात स्थान निर्माण केलं. या गाण्यावर नेटकऱ्यांनी तब्बल 4.5 मिलियन पेक्षा अधिक रिल्स बनवल्या इतकच नाही. तर हे गाणं सध्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पहिल्या क्रमांकावर आहे. तर फक्त युट्युबवर या गाण्याला तब्बल 131 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत.

National Girl Child Day : भारतात सर्वाधिक मृत्यू मुलींचेच; अत्याचारांमध्येही लक्षणीय वाढ

त्यामध्ये अगदी लहान मुलं असो तरुण असो की वयस्कर प्रेक्षक असो प्रत्येकाच्या इंस्टाग्राम स्टोरीपासून व्हाट्सअप स्टेटसपर्यंत गेल्या काही दिवसांपासून एकच गाणं होतं. ते म्हणजे ज्युबिन नौटियाल याने गायलेलं मेरे घर राम आये है. टी सिरीजने या गाण्याची निर्मिती केली. असून ज्युबिन नौटियाल याने हे गाणं गायलं आहे. तर पायल देव यांनी या गाण्याला संगीत दिलं असून, मनोज मुंतशीर यांनी हे गाणं लिहिलं आहे.

follow us