Animal Box Office Collection Day 13: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal Movie) हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच चांगली कमाई केली आहे. (Box Office Collection) या क्राईम थ्रिलरची क्रेझ चाहत्यांना वेड लावत असून त्याची चर्चा भारतातच नाही तर परदेशातही पाहायला मिळत आहे. हा चित्रपट दररोज करोडोंची कमाई करत आहे.
रणबीर कपूरच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला कमावला आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये या चित्रपटाने अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. त्यामुळे आता रणबीर कपूरच्या पठाण आणि जवान या चित्रपटाचे कलेक्शन वाढत आहे. आता अलीकडेच ‘अॅनिमल’ सिनेमाचं 13व्या दिवसाचे आकडे समोर आले आहे.
‘अॅनिमल’ने रिलीजच्या 13व्या दिवशी किती कमाई केली?
संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटाने 12व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी 12.72 कोटी रुपयांची कमाई केली. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘Animal’ ने रिलीजच्या 13व्या दिवशी 10 कोटी रुपये कमवले आहेत. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 468.71 कोटींवर पोहोचले आहे. हा अंदाज असला तरी अधिकृत आकडेवारी जाहीर झाल्यानंतर या आकड्यांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.
हा चित्रपट आता देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, जगभरात 800 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या दिशेने चित्रपटाची वाटचाल सुरू आहे. 12 व्या दिवशी या चित्रपटाने परदेशात 210 कोटींची कमाई केली. यासह एकूण कमाई 757 कोटी रुपये झाली आहे. आता जगभरातील अॅनिमलने किती कमाई केली याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. पण हा चित्रपट आता 800 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘अॅनिमल’ने तोडले ‘पठाण’ आणि ‘गदर 2’चे रेकॉर्ड
रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘एनिमल’ ने रिलीजच्या 13व्या दिवशी शाहरुख खानचा ‘पठाण’, आमिर खानचा ‘दंगल’ आणि सनी देओलच्या ‘गदर 2’ चे रेकॉर्ड तोडले आहेत. ‘अॅनिमल’ने 13व्या दिवशी 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर ‘दंगल’ने 13व्या दिवशी 8.63 कोटी आणि ‘पठाण’ने 8.25 कोटींची कमाई केली होती.
Jhimma 2 Movie Trailer : मनाला भावूक करणारा ‘झिम्मा 2’चा नवीन ट्रेलर प्रदर्शित
बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 63.8 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 71.46 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 43.96 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 37.47 कोटी रुपये कमावले होते. सहाव्या दिवशी 30.39 कोटी रुपये आणि सातव्या दिवशी 24.23 कोटी रुपये कमावले.आठवड्याचे कलेक्शन 337.58 कोटींवर पोहोचले आहे. आठव्या दिवशी 22.95 कोटी रुपये, नवव्या दिवशी 34.74 कोटी रुपये आणि दहाव्या दिवशी 36 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने अकराव्या दिवशी 13.85 कोटी रुपये आणि बाराव्या दिवशी 12.72 कोटी रुपयांची कमाई केली.