Animal Movie: ‘अॅनिमल’ प्रमोशनदरम्यान इंडस्ट्रीत बॉबी देओलची स्टाइल ठरतेय आयकॉन
Animal Ranbir Kapoor On Bobby Deol: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)ने संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमल (Animal) चा सिनेमाचे प्रमोशन जोरादार सुरू आहे. या प्रमोशनची चर्चा सध्या सोशल मीडियावर (Social media) बघायला मिळत आहे. या सिनेमात रणबीर व्यतिरिक्त बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहे.
View this post on Instagram
एका कार्यक्रमादरम्यान रणबीरने बॉबीचे (Bobby Deol) तोंडभरून कौतुक केले आहे, बॉबीचा स्टाईल आयकॉन ठरतेय असल्याचे मत त्याने यावेळी केला आहे. चाहते सध्या ‘अॅनिमल’ ची सिनेमाची वाट पाहत आहेत, आणि रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांच्यातील ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीबद्दल चाहते खूप उत्सुक झाल्याचे दिसत आहेत. ऑफ-स्क्रीन ब्रोमान्स हा रोमांचकारी प्रवासापेक्षा काही कमी नाही आणि प्रेक्षक मोठ्या पडद्यावर ही जादू पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.
गेल्या काही दिवसापूर्वी रणबीर कपूरने या सिनेमासाठी 70 कोटी मानधन घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही रक्कम त्याचा शेवटचा सिनेमा ‘तू झूठी मैं मक्कारपेक्षा खूप जास्त आहे. या सिनेमात त्याने लव्हर बॉयची भूमिका साकारली होती. या भूमिेकेसाठी त्याने 20-25 कोटी मानधन घेतले होते. अॅनिमलमध्ये रणबीर कपूरचा हटके लूक भूषण कुमार आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना महागात पडले आहे. रणबीर कपूरचे मानधन 70 कोटी इतके आहे. त्याच्या तुलनेमध्ये इतर स्टारकास्टने कमी मानधन घेतल्याची माहिती समोर आली आहे. सर्वात कमी मानधन अनिल कपूरने घेतले असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Sam Bahadur: विकी कौशलच्या आगामी सिनेमातील प्रेरणादायी ‘रब का बंदा’ गाणे रिलीज
तसेच रश्मिकाला खूप कमी मानधन दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्रीला 4 कोटी रुपये मानधन दिले आहे. अॅनिमलसाठी रणबीर कपूरला बॉबी देओल पेक्षा 14 पट जास्त मानधन दिले आहे. बॉबी देओलला जवळपास 4-5 कोटी मानधन दिले आहे. ‘अॅनिमल’ चित्रपट 1 डिसेंबरला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.