Download App

Ramayana: श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीरनं घेतलं तगडं मानधन, आकडा वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

Ranbir Kapoor Fees For Ramayana: ‘ॲनिमल’ (Animal) सारखे ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आता नितीश तिवारीच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘रामायण’साठी (Ramayana) खूप मेहनत घेत आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून याआधी रणबीरने नॉनव्हेज आणि अल्कोहोलसारख्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवले होते. या चित्रपटात प्रभू रामाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता कोणतीही कसर सोडत नसला तरी त्यासाठी तो भरघोस फी मात्र वसूल करत आहे.

बॉलीवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरने ‘रामायण’ या पौराणिक चित्रपटात रामची भूमिका साकारण्यासाठी 75 कोटी रुपयांची फी मागितली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम रणबीरच्या मागील ब्लॉकबस्टर हिट चित्रपट ‘एनिमल’ पेक्षा जास्त आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरला ‘एनिमल’साठी 30 ते 35 कोटी रुपये मानधन देण्यात आले होते.

रणबीर कपूरची फी सई पल्लवीपेक्षा 6 पट जास्त

रणबीर कपूर ‘रामायण’मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणार आहे, तर अभिनेत्री साई पल्लवीला आई सीतेच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले आहे. रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की अभिनेत्रीची फी रणबीर कपूरपेक्षा 6 पट कमी आहे. रणबीर 75 कोटी रुपयांची मागणी करत आहे, तर सई पल्लवी तिच्या भूमिकेसाठी 6 कोटी रुपये घेत आहे.

एक-दोन नव्हे तब्बल 14 वर्षांनंतर अभिनेत्याचं बॉलिवूडमध्ये कमबॅक; म्हणाला, ‘माझ्या वयाचे…’

‘रामायण’ची स्टारकास्ट

नितेश तिवारी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘रामायण’ तीन भागात बनवण्याच्या तयारीत आहेत. रणबीर कपूर आणि सई पल्लवी व्यतिरिक्त दिग्गज कलाकारांना चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकांसाठी कास्ट करण्यात आले आहे. राजा दशरथच्या भूमिकेसाठी अरुण गोविल तर भगवान हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलची निवड करण्यात आली आहे. तर लारा दत्ता कैकेयी आणि रकुलप्रीत सिंग यांना सुर्पणखाच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले आहे.

follow us