Download App

Ranbir Kapoor-Alia Bhatt : लग्नाचा पहिलाच वाढदिवस अन् रणबीरने केला धक्कादायक खुलासा!

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding Anniversary : रणबीर कपूर आणि आलिया भट हे बॉलिवूडचं क्यूट कपल गेल्या वर्षी 14 एप्रिलला विवाहबंधनात अडकलं होत. आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. तर आता ही जोडी एका मुलीचे पालक ही झाले आहेत. नुकत्याच एका इंटरव्ह्यूमध्ये रणबीर कपूरने आपल्या आणि आलियाच्या नात्याबद्दल एक खुलासा केला आहे. हा खुलासा नेमका काय आहे पाहुयात…

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये रणबीर कपूरला रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या नात्यावर आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर काही प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा रणबीर म्हणाला, ‘आपण जीवनामध्ये कधीही जीवन पूर्ण झाले आहे. आपल्याला सर्व काही मिळाले आहे. असं समाधान मानू शकत नाही. म्हणून मला वाटत की, मी एक चांगला मुलगा, नवरा आणि भाऊ नाही. पण मला एक चांगला मुलगा, नवरा आणि भाऊ बनन्याची इच्छा आहे. ही इच्छा असणे म्हणजे तुम्ही राईट ट्रॅकवर आहात. असं देखील यावेळी रणबीर म्हणाला.

दरम्यान रणबीर आणि आलियाच्या नात्याचे विविध पैलू गेल्या वर्षभरात माध्यमांमध्येही पाहायला मिळाले आहेत. चित्रपटामध्येही त्यांची केमिस्ट्री पाहायाला मिळाली. तर अभिनयासाठी त्यांनी सोबतच पुरस्कार पटकावल्याचंही दिसून आलं. पण लग्नाच्या अगोदर त्यांनी आपलं नातं खुपच गुप्त ठेवलं होतं. तर त्यांनी लग्न देखील घरीच आणि फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रांमध्ये केल्याचं पाहायला मिळालं

Satish Kaushik : सतीश कौशिक यांच्या लेकीचं भावनिक पत्र; म्हणाली, प्रत्येक दिवशी तुमची…

सध्याच्या त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर रणबीरचा गेल्या काही दिवसांपूर्वी ‘तू झूठी मैं मक्कार’ (2023) हा श्रद्धा कपूरसह चित्रपट आला होता. रणबीरच्या अपकमिंग प्रोजेक्ट्समध्ये तो रश्मिका मंदानासह ‘एनिमल’मध्ये दिसणार आहे. तर आलिया भट लवकरच रणवीर सिंहसह ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये दिसणार आहे. आलियाकडे गॅल गॅडोट आणि जेमी डॉर्ननसह ‘हार्ट ऑफ़ स्टोन’ ही आहे. नेटफ्लिक्सच्या या स्पाय चित्रपटातून आलिया हॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

Tags

follow us