Satish Kaushik : सतीश कौशिक यांच्या लेकीचं भावनिक पत्र; म्हणाली, प्रत्येक दिवशी तुमची…

Satish Kaushik : सतीश कौशिक यांच्या लेकीचं भावनिक पत्र; म्हणाली, प्रत्येक दिवशी तुमची…

Satish Kaushik Daughter : बॉलिवूड अभिनेते तसेच चित्रपट निर्माते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी सर्वात अगोदर अभिनेते अनुपम खेर यांनी दिली होती. सोशल मीडियावर (Social media) पोस्ट शेअर करताना देखील अनुपम खेर भावूक झाले होते. सतीश कौशिक यांना शेवटचा निरोप देत असताना अनुपम खेर (Anupam Kher) हे ढसाढसा रडत असल्याचे देखील आपण पाहिलं आहे.

सतीश कौशिक यांच्या अशाप्रकारे जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. इतकेच नाहीतर सतीश कौशिक यांच्या निधनानंतर काही दिवस अनेक आरोप देखजील करण्यात आले आहे. मात्र, यानंतर सतीश कौशिक यांच्या पत्नीने मोठा खुलासा देखील केला आहे. सतीश कौशिक यांच्या अत्यसंस्कार वेळी भाईजानला देखील आपले अश्रू रोखणे अवघड झाले होते. सतीश कौशिक यांना शेवटचा निरोप देत असताना भाईजान देखील ढसाढसा रडताना दिसला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)


आपले अश्रू लपवण्याकरिता सलमान खान हा वरती आकाशाकडे पाहून रडत असल्याचा दिसून आला. अनुपम खेर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सतीश कौशिक यांच्याबरोबरची मैत्री किती जूनी आणि खास आहे हे सांगितले होते. त्यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत अनुपम खेर हे सतीश कौशिक यांच्या आठवणीत भावूक झाले होते. नुकताच सतीश कौशिक यांचा भाचा निशांत याने एक मुलाखत दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)


या मुलाखतीत निशांत हा सतीश कौशिक यांच्या जाण्याने घरामधील सदस्यांची हाल कसे झाले आहेत, हे सांगत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे सतीश कौशिक यांची मुलगी वंशिका ही देखील कसे जगात आहे, हे सांगण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. निशांत म्हणाला की, बाबा सतीश कौशिक यांच्या निधनानंतर वंशिका पुर्णपणे तुटली आहे. ती सतत रडते बाबांच्या आठवणीत. इतकेच नाहीतर काल रात्री देखील ती खूप जास्त रडली आहे.

Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले

सतीश कौशिक आणि वंशिका यांच्यामध्ये वडील आणि मुलीपेक्षा एक सुंदर मैत्रीचे नाते आहे. कायम सतीश कौशिक हे बाहेर कुठे गेले की, ती सतत त्यांची वाट बघत जागी राहत असायची. वंशिका बाबांवर खूप प्रम कारफायची, पण आता ती सर्वात जास्त मिस देखील करत आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने वडिलांसाठी एक खास कार्ड देखील तयार केले आहे. फक्त वंशिकाच नाहीतर घरातील प्रत्येक सदस्य हा दु:खामध्ये आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube