Download App

Ranbir Kapoor नंतर ‘या’ सुपरस्टार्संना घेऊन येणार संदिप रेड्डी वांगा; दोन चित्रपटांचं करणार दिग्दर्शन

  • Written By: Last Updated:

Ranbir Kapoor : रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) अ‍ॅनिमल चित्रपटाच्या यशानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक संदिप रेड्डी वांगा कोणते चित्रपट घेऊन येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. त्यादरम्यानच वांगा यांनी एक पोस्ट केली आहे. त्यामुळे ही उत्सुकता आणखी शिगेला गेली आहे. कारण रणबीर नंतर वांगा हे आणखी सुपरस्टार्सना त्यांच्या आगामी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत.

20 Years: अर्शद वारसीच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ला पूर्ण झाली 20 वर्ष! अभिनेता पोस्ट लिहीत म्हणाला…

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी त्यांच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या आगामी चित्रपटांबद्दल एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी या चित्रपटांमध्ये कोणते सुपरस्टार असणार याबद्दल देखील माहिती दिली आहे. त्यामुळे स्प्रिट हा त्यांचा आगामी चित्रपट असू शकतो. ज्यामध्ये सालारमध्ये मुख्य भूमिका साकारणारा सुपरस्टार प्रभास हा मुख्य भूमिकेत असेल.

‘अटकेनंतर गाडी पोलिसांच्या ताब्यात, नंतर पिस्तूल सापडली’; ऋषिकेश बेद्रेंचा आरोप

दुसरा चित्रपट आहे. तो म्हणजे पुष्पा फेम अल्लू अर्जुन हा संदीप रंगा वांगा यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचं नाव अॅनिमल पार्क असणार आहे. त्यामुळे हे चित्रपट आणि सुपरस्टार देखील वांगांच्या अॅनिमस सारखाच धुमाकुळ घालायला सज्ज झाले आहेत. मात्र याबाबत अद्याप पूर्ण माहिती समोर आलेली नाही.

दुसरीकडे रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपटाने भारतात 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिस (Box Office) कलेक्शनबद्दल बोललो तर, चित्रपट आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. (Animal Box Office) जगभरात हा चित्रपट 900 कोटींचा टप्पा पार करणार आहे. या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. या चित्रपटाने सलमान खानच्या ‘टायगर 3’ आणि सनी देओलच्या ‘गदर 2’ तसेच शाहरुख खानच्या ‘जवान’चे रेकॉर्ड तोडले आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज