‘अटकेनंतर गाडी पोलिसांच्या ताब्यात, नंतर पिस्तूल सापडली’; ऋषिकेश बेद्रेंचा आरोप
Rushikesh Bedre : अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणी मला पोलिसांनी अटक करुन गाडी ताब्यात घेतली, त्यानंतर गाडीत पोलिसांना पिस्तूल सापडली असल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलक ऋषिकेश बेद्रे (Rushikesh Bedre) यांनी केला आहे. दरम्यान, जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली. या घटनेप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून ऋषिकेश बेद्रेला (Rushikesh Bedre) पोलिसांनी अटक केली होती. या अटकेवरुन बेद्रे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
Crakk Teaser: “जिंदगी तो साला सब के साथ खेलती है”, विद्युत जामवालच्या ‘क्रॅक’चा टीझर प्रदर्शित
ऋषिकेश बेद्रे म्हणाले, अंतरवली सराटीत 1 सप्टेंबर रोजी लाठीचार्ज झाला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी मला मुख्य आरोपी केलं आहे. गेवराई तालुक्यातील पाचेगाव ते शिंदेवाडीमध्ये पोलिसांनी मला पकडलं होतं. त्यावेळी मला त्यांच्या गाडीत घेऊन अंबडला घेऊन आले. त्यावेळी त्यांनी माझी गाडी जप्त केलेली होती. माझ्या गाडीत पिस्तूल कुठून आली, माझ्या गाडीत पिस्तूल कशी आली मला माहित नाही, त्यांनी पिस्तूल गाडीत कशी टाकली हेही माहित नसल्याचं बेद्रे म्हणाले आहेत.
Ankita Lokhande Birthday: अर्चना ते बिग बॉस अभिनेत्री अंकिता लोखंडेचा असा होता अनोखा प्रवास
तसेच अटकेदरम्यान मला कोणत्या गुन्ह्यात अटक केली जात आहे, अशी विचारणा केली असता अंतरवली सराटीत दगडफेक झाल्याच्या प्रकरणात अटक करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर मी प्रतिप्रश्न करीत मुख्यमंत्र्यांनी ते गुन्हे मागे घेतल्याचं सांगितलं पण अद्याप गुन्हे मागे घेतलेले नसल्याचं पोलिसांनी सांगितलं असल्याचं बेद्रे यांनी सांगितलं आहे. त्यावर माझा दगडफेकीच्या घटनेशी काहीही संबंध नसल्याचं सांगूनही पोलिसांनी मला अटक केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
नागपूरच्या अधिवेशनात फक्त पाट्या टाकायचे कामकाज, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
शरद पवार यांचा कुठलाही संबंध नाही :
मी समाजात काम करणारा माणूस आहे. त्यामुळे एका विवाहप्रसंगी आमदार नितेश राणे तिथं आले असता मी त्यांच्यसोबत फोटो काढला होता. शरद पवार यांचा या घटनेशी कुठलाही संबंध नसल्याचं ऋषिकेश बेद्रे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, अंतरवाली सराटी येथील हिंसाचार प्रकरणामध्ये बीडच्या गेवराई येथील ऋषिकेश बेद्रे यांच्यासह अन्य तीन जणांना अंबड पोलिसांनी अटक केली होती. दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या ऋषिकेश बेंद्रे याच्याजवळ गावठी पिस्तूलसह जिवंत काडतूस आढळून आलं होतं. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.