Crakk Teaser: “जिंदगी तो साला सब के साथ खेलती है”, विद्युत जामवालच्या ‘क्रॅक’चा टीझर प्रदर्शित

Crakk Teaser: “जिंदगी तो साला सब के साथ खेलती है”, विद्युत जामवालच्या ‘क्रॅक’चा टीझर प्रदर्शित

Crakk Teaser Released Out: अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal), अर्जुन रामपाल आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) यांचा ‘क्रॅक’ (Crakk Movie) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या धमाकेदार सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये विद्युत जामवाल हा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट्स परफॉर्म करत असल्याचे बघायला मिळाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Action Hero Films (@actionherofilms)


‘क्रॅक’ या सिनेमाच्या टीझरमध्ये विद्युत जामवालचे काही अॅक्शन सीन्स आहेत. यामध्ये विद्युत हा अनेक विविध स्टंट्स परफॉर्म करताना दिसत आहे. टीझरमध्ये विद्युत हा डोंगराच्या माथ्यावर जोरदार गाडी चालवणे, उंच इमारतीवरून उडी मारणे आणि एकदम वेगाने गाड्या चालवणे हे स्टंट करताना पाहायला मिळालं आहे. “जिंदगी तो साला सब के साथ खेलती है… लेकिन असली प्लेयर तो वही है जो जिंदगी के साथ खेले” हा डायलॉग क्रॅक चित्रपटाच्या टीझरमध्ये ऐकायला मिळत आहे.

तसेच टीझरमध्ये नोरा फतेही ही एकदम ग्लॅमरस लूकमध्ये बघायला मिळत आहे तर अर्जुन रामपालची झलक देखील या धमाकेदार टीझरमध्ये दिसत आहे.विद्युतनं सोशल मीडियावर क्रॅक या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरला त्यानं कॅप्शन दिलं आहे की, “जीतेगा तो जियेगा! ब्रेक न घेणाऱ्या पल्स-पाउंडिंग प्रवासासाठी सज्ज व्हा” या टीझरवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली आहे की, “नेहमीप्रमाणेच सर्वोत्कृष्ट अभिनेते विद्युत जामवाल हिट सिनेमासाठी सज्ज झाला आहे.”

Malaika Arora: ‘फोटो काढायला आला अन् थेट मलायकाच्या कंबरेवर…; व्हिडीओ व्हायरल

तर अॅक्शन किंग इज बॅक”, अशा भन्नाट कॉमेंट्स सध्या मिळत आहेत. आदित्य दत्त दिग्दर्शित ‘क्रॅक’ हा सिनेमा 23 फेब्रुवारी 2023 दिवशी रिलीज होणार आहे. विद्युत जामवाल, अब्बास सय्यद आणि प्रांजल खंडाडिया यांनी मिळून या धमाकेदार सिनेमाची निर्मिती केली आहे. विद्युतचा आयबी 71 (IB 71) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीला आला होता. आता विद्युतच्या ‘क्रॅक’ या सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube