Malaika Arora: ‘फोटो काढायला आला अन् थेट मलायकाच्या कंबरेवर…; व्हिडीओ व्हायरल

Malaika Arora: ‘फोटो काढायला आला अन् थेट मलायकाच्या कंबरेवर…; व्हिडीओ व्हायरल

Malaika Arora Viral Video: मलायका अरोराचा (Malaika Arora ) एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे, जो इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. (Viral Video) हा व्हिडिओ ‘झलक दिखला जा’च्या (Jhalak Dikhhla Jaa) सेटच्या बाहेरचा आहे, यामध्ये एक चाहता मलायकासोबत फोटो काढताना दिसत आहे. (Malaika Arora Viral Video) पण याच दरम्यान चाहत्याने असे काही केले ज्याची सोशल मीडियावर (social media) जोरदार चर्चा रंगत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


व्हिडिओमध्ये मलायका लाल साडीत असून पापाराझींसाठी पोज देत आहे. त्यानंतर त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी तिचे काही चाहतेही जमले. मलायकासोबत फोटो क्लिक करण्यासाठी एक अपंग चाहताही पुढे आला आणि अभिनेत्रीने त्याच्यासोबत प्रेमाने पोज दिली. दरम्यान चाहत्याने फोटो काढताना थेट मलायकाच्या कंबरेवर हात ठेवला. हे पाहून मागे उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाला आश्चर्य वाटले. आणि सुरक्षा रक्षकानेच येऊन मलायकाच्या कमरेवरून चाहत्याचा हात काढून घेतला, पण तोपर्यंत त्याने फोटो क्लिक केला होता.

Panchak Title Song: ‘भीतीची बाराखडी दिसणार, ‘पंचक’ चित्रपटाचे टायटल साँग रिलीज

सोशल मीडियावर यूजर्स अनेक भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण चाहत्याला चुकीचे म्हणत आहेत तर काहीजण अपंग असल्याचे सांगत आहेत, म्हणून त्यांनी उभे राहण्याचा आधार घेतला. एका युजरने लिहिले की, “तो एका जागी आधाराशिवाय उभा राहू शकत नाही, म्हणून त्याने मलायकाच्या कंबरेचा आधार घेतला. वाईट विचार असलेल्या लोकांचा विचार करू नका.” तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे की, “सुरक्षा रक्षकाची प्रतिक्रिया पहा.” तर तिसऱ्या उजरने लिहिले, “सुरक्षा रक्षकाच्या प्रतिक्रियेने सर्व प्रसिद्धी चोरली.” “मी माझ्या कंबरेवर हात ठेवला तेव्हा काकांचे तोंड उघडे राहिले.” तर आणखी एका युजरने लिहिले आहे की, मलायका एक चांगली व्यक्ती आहे, तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

मलायकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या फराह खान आणि अर्शद वारसीसोबत ‘झलक दिखला जा 11’ या डान्स रिअॅलिटी शोला जज म्हणून काम करत आहे. यासोबतच ती अनेक ब्रँडसाठी एंडोर्समेंट देखील करत असते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube