Viral Video: ‘दारूच्या नशेतील सनी देओलचा व्हिडीओ व्हायरल’; अभिनेत्याने सांगितलं सत्य

Viral Video: ‘दारूच्या नशेतील सनी देओलचा व्हिडीओ व्हायरल’; अभिनेत्याने सांगितलं सत्य

Sunny Deol Viral Video: बॉलिवूड सुपरस्टार सनी देओल (Sunny Deol) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘गदर 2’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. पण नुकताच या अभिनेत्याचा एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social media) समोर आला आहे. हे पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सनी मद्यधुंद अवस्थेत मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया….


सनी देओल मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर फिरताना दिसला

अभिनेत्याचा हा व्हायरल व्हिडिओ एका पेजवर समोर आला आहे. यामध्ये व्हाइट कलरचा शर्ट घातलेला अभिनेता सनी देओल मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेता मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. अभिनेत्याला पाहताच एक ऑटोचालक त्याच्याजवळ येतो आणि अभिनेत्याचा हात धरून त्याला रिक्षात बसवण्याचा प्रयत्न करत आहे. सनी देओलचा हा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांची चिंता वाढवली आहे.

अभिनेत्याने सांगितलं सत्य

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ‘घाबरण्याची गरज नाही. खरं तर, सनी देओलचा हा व्हिडिओ त्याच्या आगामी ‘सफर’ चित्रपटाच्या शूटिंगचा आहे. अभिनेत्याने ‘गदर 2’ सिनेमाच्या आधी या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. आता खुद्द सनी देओलने एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना या व्हिडिओबद्दल माहिती दिली आहे.

Kiran Mane: ‘याच्यापेक्षा देखणा ‘हिरो’ मी आयुष्यात…’, किरण मानेंची बाबासाहेबांना मानवंदना

सनीच्या व्हिडिओवर केआरकेने हे सांगितले

सनी देओलचा हा व्हिडिओ अभिनेता कमाल रशीद खान म्हणजेच केआरकेने देखील शेअर केला आहे, जो अनेकदा बॉलिवूड चित्रपटांवर त्याचे रिव्ह्यू देत असतो. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले आहे की, ‘हे खूप धोकादायक असू शकते..’ त्याचवेळी यूजर्स केआरकेच्या या ट्विटवर अनेक भन्नाट प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube