Kiran Mane: ‘याच्यापेक्षा देखणा ‘हिरो’ मी आयुष्यात…’, किरण मानेंची बाबासाहेबांना मानवंदना
Kiran Mane Post: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे काही दिवसांपासून किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील (Social media) पोस्टमुळे चर्चेत आहेत. किरण माने हे विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतचं किरण माने यांनी फेसबुकवर (Facebook) एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून (Dr Babasaheb Ambedkar) डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांना मानवंदना केलं आहे.
फेसबुकवर किरण माने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक फोटो शेअर केला. पोस्टमध्ये त्यानी लिहले आहे की, याच्यापेक्षा देखणा ‘हिरो’ मी आयुष्यात पाहिलेला नाही भावांनो… नादखुळा ॲटिट्युड. हजारो वर्ष चालत आलेल्या वर्चस्ववादावर लाथ घालून शोषितांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार करनारा हा खरा योद्धा !
जात, धर्म, वंश, पंथ, रूढी, परंपरा, रंग, भाषा, वेश, अन्न, इतिहास, भुगोल, हवामान, तापमान सगळ्या-सगळ्या बाबतीत प्रचंड वैविध्य असलेल्या या विशाल भूभागाला एक अखंड ‘देश’ म्हणून एकत्र बांधणारा… प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य-समता-बंधुता-न्याय ही मुल्यं देऊन स्वत:चा विकास करण्याचा अधिकार देणारं संविधान लिहीणारा खराखुरा महानायक ! डाॅ. बाबासाहेब आंबेडकर… विनम्र अभिवादन. जय भीम.
Jau Bai Gavat: ‘बोलताना विचार करुन बोल जा’; राणादाने अभिनेत्रीला खडसावलं
मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अरबी समुद्राला लागून असलेल्या बाबासाहेबांच्या समाधीला भेट देण्यासाठी देशभरातून लाखो भीम सैनिक येतात. अत्यंत आदरानं चैत्यभूमीला भेट देतात. बाबासाहेबांची प्रतिमा आणि मुर्तीसमोर अभिवादन करतात. दरम्यान किरण माने मनोरंजन विश्वासह सोशल मीडियावरही कायम सक्रीय आहेत. पोस्टद्वारे सामाजिक किंवा मनोरंजनक्षेत्रात घडणाऱ्या अनेक विषयांवर परखडपणे आपलं मत स्पष्ट करत असतात.