Download App

तो आला अन् त्यानं जिंकलं! ओपनिंग वीकेंडला रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ने केली 481 कोटींची कमाई

Animal Box Office: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर ‘अ‍ॅनिमल’ रिलीज होऊन 5 दिवस पूर्ण झाले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) सातत्याने नवीन रेकॉर्ड बनवत आहे. जगभरात बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची जोरदार चर्चा होत आहे. अॅनिमलने बॉक्स ऑफिसवर देखील मोठा गल्ला कमावला आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटातील रणबीर कपूरचा रक्तबंबाळ आणि अॅक्शन अवतार चाहत्यांना आवडला आहे. चार दिवसांत या चित्रपटाने 400 कोटींचा टप्पा पार केला आहे.

अॅनिमल हा सिनेमा काही दिवसात 500 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या दिवसापासून विक्रम मोडीत निघालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही आपली पकड कायम ठेवत आहे. देशात या सिनेमाने पहिल्याचं दिवशी 292.6 कोटी रुपये कमावले आहेत. तर, पाचव्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास चित्रपटाने सर्व भाषांमध्ये सुमारे 38.25 कोटींची कमाई केली आहे. सध्या या सिनेमाने 481 कोटींची कमाई केली आहे.

अॅनिमल हा सिनेमा या वर्षातील 5 वा भारतीय चित्रपट ठरला आहे. या सिनेमाने उत्तर अमेरिकेत 7 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 66 कोटींचा गल्ला जमवला आहे. पहिल्या चार चित्रपटांमध्ये किंग खानच्या पठान आणि जवान, रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि जेलर यांचा समावेश आहे.

Jaya Bachchan: “ओरडू नका…” जया बच्चन यांनी पुन्हा एकदा पापाराझींना भरला दम Video Viral

500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार

रणबीरची नजर ऑफिस कलेक्शनवर आहे, Sacknilk च्या मते, चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून दररोज 60 कोटींहून अधिक कमाई करत आहे. अॅनिमलने सोमवारी 39.9 कोटी रुपये जमा केले. त्यानंतर देशात एकूण व्यवसाय 241 कोटी रुपये झाला. पहिल्या दिवशी 63.8 कोटी रुपयांपासून सुरुवात झाली. यानंतर शनिवारी 66.27 कोटी रुपये आणि रविवारी 71.46 कोटी रुपये कमावले. भारतात या चित्रपटाने आतापर्यंत 292.6 कोटींचा आकडा पार केला आहे. त्याचबरोबर वर्ल्डवाईड अॅनिमल लवकरच 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अ‍ॅनिमलमध्ये रणबीर कपूरशिवाय बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना सारखे कलाकार दिसत आहेत. पिता-पुत्राच्या नात्यावर आधारित हा एक रिव्हेंज ड्रामा आहे.

Tags

follow us