Jaya Bachchan: “ओरडू नका…” जया बच्चन यांनी पुन्हा एकदा पापाराझींना भरला दम Video Viral

Jaya Bachchan: “ओरडू नका…” जया बच्चन यांनी पुन्हा एकदा पापाराझींना भरला दम Video Viral

Jaya Bachchan Trolling On The Archies: ‘द आर्चीज’ (The Archies )चित्रपटाचा प्रीमियर मंगळवारी (05 डिसेंबर ) संध्याकाळी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नंदा, शाहरुख खानची (Shah Rukh Khan) लेक सुहाना खान आणि अभिनेत्री श्रीदेवी, बोनी कपूरची लेक खुशी कपूर या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. या सोहळ्यात आपल्या नातीला पाठिंबा देण्यासाठी अमिताभ बच्चन यांचे संपूर्ण कुटुंबासह कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सुहाना खानच्या बिग डेच्या विथ फॅमिली प्रीमियरला शाहरुख खाननेही हजेरी लावली होती.

या कार्यक्रमात रणवीर सिंग, रणबीर कपूर, कतरिना कैफ, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, जया, रेखा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या दरम्यान जया बच्चनने (Jaya Bachchan) पुन्हा एकदा पापाराझींला दम दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


जया बच्चन यांचा व्हिडिओ व्हायरल
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी त्यांची नात नंदा हिच्या ‘द आर्चिज’च्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. संपूर्ण बच्चन कुटुंबाला एकत्र पाहून पापाराझींने सर्वांचे फोटो क्लिक केले. यादरम्यान जया बच्चन रेड कार्पेटवर टीना अंबानीसोबत फोटो क्लिक करत असताना पापाराझीवर चिडल्याचे बघायला मिळाले आहे. ती वारंवार पापाराझींना शांत बसण्याचा सल्ला देत असते.

जया बच्चनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि नेटकरी त्यांना त्यांच्या वागणुकीवरून पुन्हा एकदा ट्रोल करत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी जया बच्चन खूप अहंकारी असल्याचे लिहिले. त्यांना पाहून रेखाजींची आठवण आल्याचे अनेकांनी लिहिले आहे. एका यूजरने लिहिले की, “जर तुम्हाला आवाजाची एवढी समस्या असेल तर तुम्ही प्रीमियर किंवा अशा कोणत्याही कार्यक्रमाला येऊ नका.

Mahaparinirvaan Movie: ‘महापरिनिर्वाण’ सिनेमाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला

‘द आर्चीज’मधून अनेक स्टारकिड्स डेब्यू करत आहेत.

‘द आर्चीज’ बद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट लोकप्रिय कॉमिक्स आर्चीजचे भारतीय रूपांतर आहे. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटातून अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. त्यामध्ये अमिताभ बच्चन यांची नात नंदा, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अभिनेत्री श्रीदेवी आणि जान्हवी कपूरची मुलगी आणि बहीण खुशी कपूर बी-टाऊनमध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करत आहेत. हा चित्रपट 7 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube