Download App

Pamela Chopra Passes Away: राणी मुखर्जीच्या सासूचे निधन

  • Written By: Last Updated:

Pamela Chopra Passes Away: बॉलिवूडची लोकप्रिय राणी मुखर्जीची सासू आणि दिवंगत दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा यांची पत्नी पामेला चोप्रा यांचा निधन झालंय. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.आज वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पॅमेला यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीला मोठा धक्काबसला आहे. पॅमेला या एक उत्तम गायिका होत्या. त्यांनी यश चोप्रा यांच्या अनेक चित्रपटांना म्युझिक दिलं होतं. इतकंच काय तर त्या एक फिल्म राईटर आणि निर्मात्या देखील होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार पामेला चोप्रा यांच्या अंत्यसंस्काराबद्दल अद्याप कोणती देखील माहिती चोप्रा कुटुंबाकडून देण्यात आली नाही. दरम्यान, पामेला चोप्रा अखेरच्या यशराज फिल्म्सची डॉक्युमेंटरी ‘द रोमॅंटिक्स’मध्ये शेवट दिसल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी त्यांचे दिवंगत पती यश चोप्रा आणि त्यांच्या प्रवासाविषयी सांगितले होते. रोमँटिक्समध्ये यश चोप्रा यांनी हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये दिलेल्या योगदानाविषयी भाष्य करण्यात आले होते.


तसेच पामेला यांच्या योगदानाचा उल्लेख देखील करण्यात होता. पामेला यांनी १९७० मध्ये यश चोप्रा यांच्याशी पारंपरिक पद्धतीने लग्न केले होते. ते अरेंज मॅरेज लग्न होतं. त्यांना आदित्य आणि उदय चोप्रा ही दोन मुले आहेत. आदित्य हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. त्याने राणी मुखर्जीशी लग्न केले आहे. तर, उदय एक अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे.

IT Raid : टी-सिरीजचे निर्माते विनोद भानुशालीसह अनेकांवर आयटीची छापेमारी

पामेला चोप्राच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. शाहरुख खान, काजोल, सलमानसह अनेक कलाकार त्यांच्या अगदी जवळच्या कुटुंबासारखे होते. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच दुःख झाले आहे.

 

Tags

follow us