सिनेमा माझ्यासाठी एक खोल भावना आहे आणि महाराष्ट्र त्या भावनेचं घर आहे – राणी मुखर्जी

62व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रतिष्ठित राज कपूर स्पेशल कॉन्ट्रिब्यूशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

Untitled Design   2026 09 10T102156.659

Untitled Design 2026 09 10T102156.659

Rani Mukerji presented with this award : प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांना मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित 62व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रतिष्ठित राज कपूर स्पेशल कॉन्ट्रिब्यूशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राणी मुखर्जी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सरकारचे माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार, महाराष्ट्र सरकारमधील मान्यवर सदस्य, प्रतिष्ठित पाहुणे आणि चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित होते.

हा सन्मान राणी मुखर्जी यांच्यासाठी अत्यंत खास आणि वैयक्तिक महत्त्वाचा आहे. मुंबईत जन्मलेल्या आणि याच शहरात वाढलेल्या राणी यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील जवळपास तीन दशकांचा आपला प्रवास याच शहरातून घडवला आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते राज कपूर यांच्या नावाने दिला जाणारा हा सन्मान स्वीकारताना राणी म्हणाल्या, “माझ्यासाठी महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही. महाराष्ट्र माझी जन्मभूमी आहे. माझी कर्मभूमी आहे. आणि माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे.”

हा सन्मान विशेष का आहे, याबद्दल बोलताना त्या पुढे म्हणाल्या, “मला वाटतं, यामुळेच हा क्षण माझ्यासाठी खऱ्या अर्थाने विशेष ठरतो, कारण हा सन्मान मला माझ्या स्वतःच्या लोकांकडून आणि मी ज्या भूमीशी जोडलेली आहे, त्या ठिकाणाहून मिळत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज राज कपूरजी यांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार स्वतःमध्येच माझ्यासाठी अत्यंत नम्र करणारा आणि मोठा सन्मान आहे. आणि मला मनापासून आशा आहे की मी या सन्मानाला पात्र ठरेन.”

Amruta Fadnavis On Manoj Jarange : मनोज जरांगे माझे भाऊ, त्यांना घरी जेवायला निमंत्रण देते

राणी यांनी मुंबईसोबतच्या आपल्या अतूट नात्याबद्दलही भाष्य केले. पडद्यावर आणि पडद्यामागे त्यांच्या प्रवासाची साक्षीदार असलेल्या या शहराबद्दल त्या म्हणाल्या, “मुंबईने मला माझी ओळख दिली. मला प्रेक्षक दिले. मला करिअर दिलं. आणि हे माझं घर, माझी सुरक्षित जागा, माझं सर्वस्व राहिलं आहे. त्यामुळे हा पुरस्कार माझ्या हृदयात कायमच एक विशेष स्थान राखेल, कारण जेव्हा जेव्हा मी हा पुरस्कार पाहीन, तेव्हा मला फक्त एक पुरस्कार दिसणार नाही. मला माझी मुंबई, माझा महाराष्ट्र दिसेल.”

ब्लॅक, नो वन किल्ड जेसिका, हिचकी, मर्दानी फ्रँचायझी आणि मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे यांसारख्या चित्रपटांमधून सशक्त, बहुआयामी आणि संघर्षशील महिलांची पात्रं साकारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राणी यांनी कायमच स्वतःशी जोडल्या जाणाऱ्या कथा आणि व्यक्तिरेखांची निवड केली आहे. सिनेमाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “योग्य भावना आणि संवेदना असलेल्या सिनेमाच्या माध्यमातून भारतातील सशक्त मुली आणि महिलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी नेहमीच शांतपणे काम केलं आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “मला सत्य वाटणारी पात्रं मी निवडली. त्यांच्या कथा, त्यांचा प्रवास आणि त्यांचा संघर्ष मला सहजपणे आकर्षित करायचा. ज्या पात्रांमध्ये धैर्य होतं. ज्यांच्यामध्ये उणिवा होत्या. जी पात्रं पार्श्वभूमीत हरवून जाण्यास नकार देत होती. अशा महिला ज्या कोणीतरी दुसऱ्याने येऊन आपल्याला वाचवण्याची वाट पाहत नव्हत्या.” राणी यांच्यासाठी सिनेमा हा कायमच केवळ व्यवसाय किंवा पेशा राहिलेला नाही. महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टीच्या व्यापक भूमिकेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “मी सिनेमाकडे कधीच केवळ एक व्यवसाय म्हणून पाहिलं नाही. माझ्यासाठी सिनेमा ही एक खोल भावना आहे. आणि महाराष्ट्र त्या भावनेचं घर आहे.”

Apple चा पहिला फोल्डेबल iPhone भन्नाट फिचर्ससह लॉन्च; किंमत फक्त 3 लाख रुपये

महाराष्ट्राला भारतासह जगातील सर्वात प्रभावशाली सिनेमाकेंद्रांपैकी एक बनवण्यात योगदान देणाऱ्या हजारो कलाकार, तंत्रज्ञ, चित्रपट निर्माते आणि कथाकारांचेही त्यांनी कौतुक केले. त्या म्हणाल्या, “इथे हजारो आणि हजारो लोक आहेत, जे दररोज सकाळी एका स्वप्नासह उठतात—एक कथा सांगण्याचं स्वप्न. आणि या कथा केवळ इथेच थांबत नाहीत. त्या मुंबईपासून महाराष्ट्रात, महाराष्ट्रापासून भारतात आणि भारतापासून संपूर्ण जगात पोहोचतात. हीच या राज्यात बहरणाऱ्या चित्रपटसृष्टीची जादू आणि ताकद आहे.”

राणी यांनी हा सन्मान महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करताना म्हटलं, “म्हणूनच, मनापासून कृतज्ञता व्यक्त करत मी हा पुरस्कार महाराष्ट्राला समर्पित करते. महाराष्ट्रातील जनतेला. इथल्या कलाकारांना. इथल्या तंत्रज्ञांना. इथल्या चित्रपट निर्मात्यांना. या सुंदर राज्याला आपलं घर मानणाऱ्या संपूर्ण चित्रपटसृष्टीला. आणि आपल्याआधी आलेल्या त्या कथाकारांच्या पिढ्यांना, ज्यांनी माझ्यासारख्या मुलीला स्वप्न पाहण्याची संधी मिळवून दिली.”

राज कपूर स्पेशल कॉन्ट्रिब्यूशन अवॉर्ड हा राणी मुखर्जी यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाचा तसेच मुंबई आणि महाराष्ट्रासोबतच्या त्यांच्या प्रदीर्घ आणि दृढ नात्याचा गौरव करणारा सन्मान आहे. पिढ्यान्‌पिढ्या महाराष्ट्र राज्य भारताच्या सिनेमाच्या प्रवासाच्या केंद्रस्थानी राहिले आहे.

Exit mobile version