Rani Mukerji Shah Rukh Dance on Tu Pili Tu Aakhri : बॉलिवूडमध्ये (Bollywood) एक अप्रतिम क्षण पाहायला मिळाला, जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन आयकॉनिक कलाकार शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji)– पुन्हा एकदा एकत्र झळकले. आर्यन खानच्या (Aryan Khan) दिग्दर्शकीय पदार्पण मालिकेतील गाणं ‘तू पहिली तू आखरी’वर या दोघांनी (Tu Pili Tu Aakhri) केलेल्या डान्सने चाहत्यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे.
‘क्वीन’ आणि ‘किंग खान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जोडीने बॉलिवूडच्या एका संपूर्ण दशकाला नवा आयाम दिला होता. कुछ कुछ होता है पासून ते कभी अलविदा ना कहनापर्यंत, या दोघांच्या केमिस्ट्रीनं चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. आता आर्यन खानच्या मालिकेत त्यांच्या खास अंदाजातली ही परफॉर्मन्स पाहून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.
Breaking! मराठा आरक्षणसाठी सरकारचा नवा फॉर्म्युला जवळपास ठरला, जरांगेंसमोर मांडला जाणार?
हे गाणं टी-सीरिजच्या बॅनरखाली प्रदर्शित झालं आहे. मालिकेच्या कथानकात प्रेम आणि तळमळीचा भाव अधिक गडद करतं. आर्यन खान दिग्दर्शित द बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड ही मालिका 18 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या निर्मितीत तयार झालेली ही मालिका आर्यन खानसोबत बिलाल सिद्दीकी आणि मानव चौहान यांनी सहनिर्मित केली आहे.
देवेंद्र फडणवीस कुटील डाव खेळत आहेत, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप…
ही मालिका एका स्टायलाइज्ड पण गोंधळलेल्या जगात प्रेक्षकांना नेईल, जिथे महत्त्वाकांक्षा, विनोद, संघर्ष, आणि आता रोमॅन्स एकत्र गुंफलेले आहेत. मालिकेत बॉबी देओल, लक्ष्य, साहेर बंबा, मनोज पाहवा, मोना सिंग, मनीष चौधरी, राघव जुयाल, अन्या सिंह, विजयंत कोहली, गौतमी कपूर आणि रजत बेदी यांसारखे दमदार कलाकार झळकणार आहेत. द बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड 18 सप्टेंबरपासून फक्त नेटफ्लिक्सवर.