मर्दानी ३ मधून राणी मुखर्जी पुन्हा एकदा पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत झळकणार

यापेक्षा मोठा निस्वार्थ भाव दुसरा कोणता असू शकत नाही, आणि मला अभिमान आहे की मर्दानीच्या माध्यमातून मी त्यांना सलाम करू शकते

News Photo (45)

News Photo (45)

यशराज फिल्म्सच्या मर्दानी ३ मधून राणी मुखर्जी पुन्हा एकदा पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत झळकणार आहेत. या ब्लॉकबस्टर फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात राणी पुन्हा गुन्हेगारी जगताशी सामना करताना दिसणार आहे. भारतीय पोलिस दिन २०२५ च्या निमित्ताने अभिनेत्रीने देशभरातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सलाम करत त्यांच्या अदम्य धैर्याला, समर्पणाला आणि निस्वार्थ सेवाभावाला अभिवादन केले आहे.

राणी मुखर्जी म्हणाल्या,“माझ्यासाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे की मर्दानी या चित्रपटा द्वारे मी भारतीय पोलिस दलाला सलाम करू शकते. देशभरात पोलिस दल जे कठोर परिश्रम आणि समर्पणाने काम करते, त्यांचा सन्मान करण्याची प्रत्येक संधी मी घेत असते. आपल्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोलिस अधिकारी लोकांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस तत्पर असतात — स्वतःचा जीव धोक्यात घालून, आपल्या कुटुंबापासून दूर राहून. त्यांच्या या कार्याचे वर्णन शब्दांत करणे कठीण आहे.

प्रसिद्ध पंजाबी गायक तेजी काहलोंवर कॅनडामध्ये गोळीबार; या गँगने जबाबदारी स्वीकारली अन् कारणही सांगितलं

त्या पुढे म्हणाल्या,“भारतीय पोलिस दिनानिमित्त मी भारतीय पोलिस दलाच्या शौर्य, निष्ठा आणि निस्वार्थ सेवा भावाला मनःपूर्वक सलाम करते. ते प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी अहोरात्र झटत असतात. आपण हे विसरू नये की त्या वर्दीच्या मागे एक माणूस असतो — ज्याने चांगुलपणाचा मार्ग निवडला आहे, सेवा हीच आपली जबाबदारी मानली आहे आणि देशाला प्रथम स्थान दिले आहे. तेही कोणाचे तरी लेकरू, पती, पत्नी, वडील, आई आहेत. मला या दलाबद्दल मनापासून आदर आहे आणि प्रत्येक भारतीयापर्यंत ही भावना पोहोचवणे हे माझे कर्तव्य आहे.”

राणी मुखर्जी यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या साहसाचे कौतुक करत सांगितले,“पोलिस अधिकारी जे करतात ते खरंच अद्वितीय आहे. ते घरातून निघतात, पण परत येतील याची खात्री नसते. ते धोकादायक गुन्हेगारांना सामोरे जातात, निर्भयपणे उभे राहतात. त्यांचे धैर्य आणि चिकाटी पाहून मी नेहमी प्रभावित झाले आहे. त्यांच्या आयुष्याने मला निर्भय राहण्याची शिकवण दिली आहे. त्यांच्या त्यागाची दखल आपण नेहमी घेतली पाहिजे. कारण ते देशासाठी आपल्या आयुष्यातील अमूल्य क्षण गमावतात.

यापेक्षा मोठा निस्वार्थ भाव दुसरा कोणता असू शकत नाही, आणि मला अभिमान आहे की मर्दानीच्या माध्यमातून मी त्यांना सलाम करू शकते.”त्या म्हणाल्या,“भारतीय पोलिस दल हे आपल्याला खऱ्या शौर्याचा, समर्पणाचा आणि देशभक्तीचा अर्थ दाखवते. आपण सगळ्यांनी त्यांच्याकडून शिकायला हवे की आपल्या परीने देशासाठी उभे राहणे म्हणजे काय. आदित्य चोप्रा निर्मित आणि अभिराज मिनावाला दिग्दर्शित मर्दानी ३ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version