Download App

Rocky Aur Rani Ki Prem Kahani चं पहिलं गाणं रिलीज; अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

Rocky aur Rani ki Prem kahani song release : यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेला रणवीर सिंग आणि आलिया भटचा (Ranveer-Aalia) चित्रपट म्हणजे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky aur Rani ki Prem kahani) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आल्यापासूनच या चित्रपटाची आणि आलियाच्या (Aalia) लूकची प्रचंड चर्चा आहे. त्यामध्ये आता या चित्रपटाचं पोस्टर लॉन्चनंतर चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. ( Ranveer Aalias Rocky Aur Rani Ki Prem Kahani first song out )

उत्तर प्रदेश हादरलं! भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्यावर गोळीबार

‘तुम क्या मिले’ (Tum Kya Mile) असं या गाण्याचं नाव आहे. तर या गाण्याला चित्रपटाचे दिग्दर्शक करण जोहरने यश चोप्रा यांना समर्पित केलं आहे. तर रोमॅंटीक अंदाजामध्ये असलेलं हे गाणं रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. हे गाणं रिलीज होताच प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

वारकऱ्यांनो, विठ्ठल मंदिरात येतांना धोतरच परिधान करा; भिडेंचा अजब सल्ला

‘तुम क्या मिले’ हे गाणं प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग आणि श्रेया घोषालने गायलं आहे. तर संगीतकार प्रीतम यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. तसेच या गाण्यावर रणवीर सिंग आणि आलिया भट थिरकले त्या डान्सची कोरिओग्राफी कोरिओग्राफर वैभवी मर्चंटने केली आहे.

हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 28 जुलै 2023 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंग आणि आलिया भटच्या प्रमुख भूमिका असणार आहेत तर त्यांच्याबरोबर धर्मेंद्र, जय बच्चन आणि शबाना आझमी या दिग्गजांची फौज असणार आहे. करण जोहरने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाबद्दलची उत्सुकता त्याने शेअर केलेल्या पोस्टवरून दिसून येत आहे.

Tags

follow us