वारकऱ्यांनो, विठ्ठल मंदिरात येतांना धोतरच परिधान करा; भिडेंचा अजब सल्ला
Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असतात. भिडे आणि त्यांची वादग्रस्त हे समीकरण आता नवं राहिल नाही. त्यांच्या वक्तव्यानंतर आरोप-प्रत्यारोपांची राळ उठते. स्वातंत्र्य दिनासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता संभाजी भिडे यांनी पंढरपूरातील वारकऱ्यांना (Warkari) अजब सल्ला दिला. आषाढी यात्रेनिमित्त (Ashadhi Yatra)पंढरपूरला येणाऱ्या भाविकांनी धोतर परिधान करून विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी यावं, असं संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर पंढरपुरात ड्रेसकोड (Dress code in Pandharpur) लागू करावा, अशी मागणीही भिडे यांनी केली आहे. (Dress code should be implemented in Pandharpur, demand of Sambhaji Bhide)
तुळजापूरच्या मंदिराच्या पेहराव वादानंतर संभाजी भिडे यांनी पंढरपुरात ड्रेसकोड लागू करण्याची मागणी केली. भिडेंनी ड्रेसकोड लागू करण्याची मागणी केल्यानं राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे आज पंडपुरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधतांनी ही मागणी केली. यावेळी बोलतांना संभाजी भिडे म्हणाले की, मला संत, महंत आणि वारकरी मंडळींना सांगायचे आहे की, त्यांनी पँट घालून पंढरपूरला येऊ नाही, तसंच विठ्ठल मंदिरामध्ये सुध्दा प्रवेश करू नाही. वारकरी आणि विठ्ठलभक्तांनी धोतर परिधान करूनच मंदिरात यावे, असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. भिडे म्हणाले की, धोतर हा सर्व संत-महंतांचा पेहराव आहे. पँट हा ब्रिटिशांचा वेश आहे. त्यामुळे वारकरी भाविकांनी संस्कृती जपत पंढरपूर व मंदिरात यावे. वारीला येताना पँट शर्ट घालू नये, पंढरपुरात तातडीने ड्रेस कोड लागू करावा, अशी मागणीही संभाजी भिडे यांनी केली आहे.
व्हॉट्सॲप यूजर्ससाठी खुशखबर! टेलीग्रामलासारखे मेसेज पिन करता येणार
काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात देशाचा स्वातंत्र्यदिन, राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन नाही. या दिवशी देशाची फाळणी झाली. त्यामुळेच हा दिवस काळा दिवस म्हणून पाळावा आणि लोकांनी उपोषण करावे, असे विधान भिडे यांनी केले होते. भिडे यांनी भारतीय स्वातंत्र्याबाबत केलेल्या या विधानावरून वाद निर्माण झाला असून भिंडे विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाली. भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
भिडेंची वादग्रस्त वक्तव्ये :
आंबे खाल्ल्याने मुले होतात या दाव्यामुळे भिडेंवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. यानंतर त्यांनी एका महिला पत्रकाराला ‘आधी टिकली लाव, मग मी तुझ्याशी बोलतो’ असे उत्तर दिल्यानं राज्यातील वातावरण तापलं होतं.