Download App

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: आलिया-रणवीरची रोमँटिक केमिस्ट्री; ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा ट्रेलर आऊट

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Trailer : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आले आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.


‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani Trailer) या सिनेमाच्या माध्यमातून करण जोहर (Karan Johar) एक नवी कोरी प्रेम कहानी घेऊन चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात चाहत्यांना पुन्हा एकदा करण जोहरची हटके स्टाइल बघायला मिळाला आहे. आलिया आणि रणवीरचा रोमान्स चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरला आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. करण जोहरने या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत लिहिले आहे,”प्रेमाची शक्ती आणि प्रेमाला साथ देणारं कुटुंब… दोन्ही अपराजित… रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची झलक नक्की पाहा. २८ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या ट्रेलरमध्ये आलिया आणि रणवीरची लव्हस्टोरी बघायला  मिळणार आहे. कौटुंबिक नाट्य असणाऱ्या या चित्रपटाचे कथानक चांगलीच रंजक असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते प्रतीक्षा करत आहेत. आता येत्या २८ जुलैला हा बहुचर्चित चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Maharashtra Political Crisis: ‘महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठी कलाकारांच्या भन्नाट प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले…

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या माध्यमातून करण जोहर तब्ब्ल ७ वर्षांनी कमबॅक केला आहे. या चित्रपटात आलिया-रणवीरसह शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन हे कलाकार झळकणार आहेत. तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी बघायला मिळणार आहे.

बंगाली मुलगी आणि पंजाबच्या मुलाची हटके लवस्टोरी बघण्यासाठी चाहते देखील मोठे उत्सुक झाले आहेत. रणवीरने या चित्रपटात रॉकी रंधावाची भूमिका साकारलीआहे. तर आलिया रानीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे कथानक इथिता मोइत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिले आहे.

Tags

follow us