Ranveer Singh Action On Deepfake Video: तंत्रज्ञानाच्या युगात जिथे एकीकडे माणूस खूप प्रगती वाढत आहे, तर दुसरीकडे अनेक आव्हानेही उभी राहत आहेत. शिवाय, ते अत्यंत धोकादायक बनत चालले आहेत आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे सध्याच्या काळात मोठे आव्हान बनले आहे. कतरिना कैफपासून रश्मिका मंदान्ना पर्यंतचे डीपफेक व्हिडिओ समोर आले आहेत आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
अलीकडे, निवडणुकीदरम्यान बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंगचा (Ranveer Singh) एक व्हिडिओ समोर आला. ज्यामध्ये तो एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. पण हा डीपफेक व्हिडिओ (Deepfake Video) आहे. आता रणवीरने या बनावट व्हिडिओवर कारवाई केली आहे.
या डीपफेक व्हिडिओवर कारवाई करत रणवीर सिंगने एफआयआर (FIR ) दाखल केली आहे. रणवीर सिंगच्या प्रवक्त्याने पुष्टी केली आहे की या डीपफेक व्हिडिओवर पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि आता सायबर क्राइम सेल या प्रकरणाची चौकशी करणार आहे. स्टेटमेंट जारी करताना, रणवीर सिंगच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि रणवीर सिंगच्या AI- डीपफेक व्हिडिओची जाहिरात करणाऱ्या हँडलविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
काँग्रेसच्या समर्थनार्थ ‘पुष्पा’ फेम अभिनेता उतरला रस्त्यावर? Viral Video मागील सत्य काय?
चाहत्यांना इशारा दिला
हा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रणवीर सिंगने चाहत्यांना डीपफेक व्हिडीओबाबत सावध केले होते. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती आणि लिहिले होते की, “मित्रांनो, डीपफेक टाळा.” डीपफेकची अनेक प्रकरणे अलीकडच्या काळात समोर आली आहेत. याआधी बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तो एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसत होता. या प्रकरणी एफआयआर देखील दाखल करण्यात आला होता.