Pm Narendra Modi : …तर बाबासाहेबांचं संविधान संपूर्ण भारतात लागू करण्याची हिंमत का नाही दाखवली?

Pm Narendra Modi : …तर बाबासाहेबांचं संविधान संपूर्ण भारतात लागू करण्याची हिंमत का नाही दाखवली?

Pm Narendra Modi News : विरोधकांना संविधान एवढं महत्वाचं होतं तर बाबासाहेब आंबेडकरांचं (Dr. Babasaheb Ambedkar) संविधान संपूर्ण भारतात लागू करण्याची हिंमत का नाही दाखवली? असा खडा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी काँग्रेस नेत्यांना (Congress) केला आहे. दरम्यान, नागपूरमधील रामटेक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ मोदींनी हजेरी लावली. यावेळी आयोजित प्रचारसभेत बोलताना मोदींनी काँग्रेससह इंडिया आघाडीच्या सर्वच पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

PM मोदींच्या सभेला जाताना मोठी दुर्घटना : आमदार आशिष जैस्वाल यांच्या गाडीचा भीषण अपघात; दोन ठार

पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी वर्गाला कट कारस्थाने करुन नेहमीच पिछाडीवर ठेवलं आहे. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारण संपवलं. काँग्रेस सरकारच्या काळात बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार दिला नाही. भाजपच्या समर्थनाने सरकार बनलं तेव्हा बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. बाबासाहेबांना काँग्रेसने भारतरत्न पुरस्कारापासून वंचित ठेवलं असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.

Naad – The Hard Love चा फर्स्ट लूक प्रदर्शित; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

‘हा मोदी आहे ज्याने बाबासाहेबांचं संविधान लागू केलं’
भारत स्वातंत्र्य झाल्यापासून संपूर्ण देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू नव्हतं. याला जबाबदार कोण आहे? हा मोदी आहे ज्याने काश्मीर ते कन्याकुमारी बाबासाहेबांचं संविधान लागू करुन दाखवलं. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 काँग्रेसने ठेवलं होतं. कलम 370 ची भींत उभी होती. आपण कलम 370 रद्द करु अशी भूमिका मांडल्यानंतर आग लागणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली होती. आता कुठं आग लागली? आज बाबासाहेबांची आत्मा जिथे असेल आज मोदींना आशिर्वाद देतील. एक देश, एक संविधान काँग्रेसने लागू करु दिलं नाही, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

तसेच कलम 370 हटवल्याने जम्मूमध्ये सर्व प्रवर्गातील लोकांना संविधानिक अधिकार मिळाले आहेत. जम्मूमधील एससी, एसटी, समाजाला आरक्षण मिळत नव्हतं. तिथल्या दलितांना हक्क मिळत नव्हते, मी बोलतो तेव्हा विरोधकांना टोचतं, काँग्रेसने तिथल्या महिलांना अधिकारांपासून वंचित ठेवलं होतं. बाबासाहेबांनी दिलेले अधिकार जम्मूच्या लोकांना नव्हते. आज तुम्ही लोकांना मूर्ख बनवत आहात. आता बाबासाहेबांचं संविधान लागू झालं असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज