Download App

‘हा सोपा निर्णय नव्हता’, द साबरमती रिपोर्ट बद्दल राशी खन्नानने केला मोठा खुलासा

Rashi Khanna : युवा पॅन-इंडिया स्टार राशि खन्ना (Rashi Khanna) अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती जिथे तिने तिच्या आगामी चित्रपट

  • Written By: Last Updated:

Rashi Khanna : युवा पॅन-इंडिया स्टार राशि खन्ना (Rashi Khanna) अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती जिथे तिने तिच्या आगामी चित्रपट ‘द साबरमती रिपोर्ट’ (The Sabarmati Report) बद्दल चर्चा केली. संभाषणादरम्यान तिने तिचा अनुभव आणि हा प्रोजेक्ट निवडण्यामागील प्रेरणा याबद्दल खुलासा केला.

तिने हा चित्रपट का निवडला हे विचारल्यावर राशीने स्पष्ट केले की, “एक महिला म्हणून ही भूमिका माझ्यासाठी वेगळी आहे आणि जेव्हा मला ती भूमिका साकारण्याची संधी मिळाली तो क्षण खास आहे. अशी एक गोष्ट जिने अनेक गोष्टीचा उलगडा करून सत्य दाखवल. मला माझे तथ्य बरोबर समजले. हा एक सोपा निर्णय नव्हता आणि मला त्यात सांगायचे होते. मला काय झाले ते समजून घ्यायचे होते आणि साबरमतीसारख्या खास गोष्टीचा भाग बनायचे होते”

तर दुसरीकडे या चित्रपटात ती एका पत्रकाराची भूमिका साकारत आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाकडून काय अपेक्षा करू शकतात याबाबत ती म्हणाली की, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कदाचित ट्रेलरमध्ये देखील प्रकट होतील.

पुढे ती म्हणाली अभिनेत्री म्हणून आमच्यावर सामाजिक जबाबदाऱ्या आहेत आणि जे लोक ते पाहत आहेत त्यांच्यावर त्याचा परिणाम होणार आहे हे मला माहीत आहे. आम्हाला याची जाणीव होती आणि म्हणूनच आमच्या टीमनेही विशेष मेहनत घेतली असे मला वाटते. त्यामुळे नुकताच प्रदर्शित झालेला टीझर पाहता, चित्रपट काय ऑफर करतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

या चित्रपटात राशी खन्नासह  विक्रांत मॅसी (Vikrant Massey) मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात, राशीने साबरमती एक्स्प्रेस घटनेमागील सत्य उघड करण्याच्या मिशनवर एका पत्रकाराची भूमिका केली आहे. हा चित्रपट गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ 27 फेब्रुवारी 2002 रोजी घडलेल्या घटनेवर आधारित आहे.

पाकिस्तानचा 3 वर्षांनंतर मायदेशात मालिका विजय; तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा पराभव

धीरज सरना दिग्दर्शित हा चित्रपट  15 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये येणार आहे. याबरोबरच  ‘तलाखों में एक’ या चित्रपटामध्ये विक्रांत मॅसीसोबत एकत्र दिसणार आहे. तसेच ती  ‘तेलुसू काडा’ हा तेलुगु चित्रपटमध्येही दिसणार आहे.

follow us