Sahitya Sammelan: साहित्यिक रवींद्र शोभणे कोण आहेत? जाणून घ्या त्यांचा आतापर्यंतचा प्रवास

Marathi Sahitya Sammelan: जळगावच्या अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड झाली आहे. पुण्यातील साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये रवींद्र शोभणे (Dr Ravindra Shobhane) यांच्या नावाला अध्यक्षपद देण्यात आले आहे. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी, ज्येष्ठ समीक्षक यांची देखील […]

Dr Ravindra Shobhane

Dr Ravindra Shobhane

Marathi Sahitya Sammelan: जळगावच्या अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड झाली आहे. पुण्यातील साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये रवींद्र शोभणे (Dr Ravindra Shobhane) यांच्या नावाला अध्यक्षपद देण्यात आले आहे.

प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी, ज्येष्ठ समीक्षक यांची देखील नावे चर्चेत होती. परंतु रवींद्र शोभणे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. पुण्यातील बैठकीत संमेलनाच्या तारखांवर देखील चर्चा करण्यात आली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन

पुण्यामध्ये आजच्या बैठकीविषयी अध्यक्षा उषा तांबे दिली आहे. यंदाच ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे. या संमेलनासाठी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड एकमताने करण्यात आली. त्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तसेच संमेलनाच्या पद्धतीने सर्व कार्यक्रम होणार असल्याचे यावेळी माहिती देण्यात आली आहे.

रवींद्र शोभणे हे एक कथाकार, कादंबरी लेखक तसेच समीक्षक आहेत. रवींद्र शोभणे यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये ‘उत्तरायण’साठी महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार, मारवाडी प्रतिष्ठान पुरस्कार, घनश्यामदास सराफ पुरस्कार, इत्यादी कादंबरी पुरस्कार देण्यात आले आहेत.

Exit mobile version