Download App

Ameen sayani : गायक होण्याच होतं स्वप्न; रेडिओवरुन अजरामर झाला आवाज

Ameen Sayani: रेडिओ आणि आवाजाच्या जगतातील बादशाह अमीन सयानी (Amin Sayani) यांचं नुकतंच दुखःद निधन झालं. सयानी यांनी आपल्या आवाजाने आणि शैलीने रेडिओचे जग बदलून टाकले होते. त्यांचा ‘बिनाका गीतमाला’ हा आधी रेडिओ सिलोनवर (Radio Ceylon) आणि नंतर विविध भारतीवर प्रसारित झालेला कार्यक्रम देशातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये 40 वर्षांहून अधिक काळ लोकप्रिय होता. सयानी यांच्या जाण्याने रेडिओ जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

अमीन सयानी यांचा जन्म २१ डिसेंबर १९३२ रोजी मुंबईतील एका सर्वसामान्य गुजराती भाषिक मुस्लिम परिवारात झाला. सयानी यांचे शालेय शिक्षण सिंधिया स्कुल तर महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्समध्ये पार पडले. अमीन सयानी यांच्या आई कुलसुम या एक स्वातंत्र्य सैनिक होत्या, तसंच महात्मा गांधी यांच्या शिष्या ही होत्या. त्यामुळे सयानी यांच्यावर लहानपणापासूनच महात्मा गांधी यांचा प्रभाव होता. ते स्वतःला गांधीवादी म्हणतं. सयांनी यांनी लग्न काश्मिरी पंडित असलेल्या स्व. रमा मट्टू यांच्या सोबत झाले होते.

आमीन सयानी यांना त्यांचे भाऊ हमीद सयानी यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये वयाच्या अकराव्या वर्षी कामास लावले. त्यानंतर आमीन यांनी पुढील दहा वर्ष इंग्रजी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. त्यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातील गायक म्हणून नाव मिळविण्याची त्यांची इच्छा होती. मात्र रेडिओमध्ये काम करत सयानी यांनी त्यांचा आवाज देशभरात अजरामर केला. ऑल इंडिया रेडिओला लोकप्रियता मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी १९५१ पासून ५४ हजारहून अधिक रेडिओ कार्यक्रम आणि १९ हजारपेक्षा जिंगल्सची त्यांनी निर्मिती केली आहे. सयानी भूत बंगला, टीन देवियन, बॉक्सर, आणि कतल यांसारख्या अनेक चित्रपटात देखील दिसले होते. या सर्व चित्रपटात त्यांनी केवळ रेडिओ निवेदकाच्या भूमिका निभावली होती.

अमीन सयानी यांनी निर्माण केलेले किंवा सूत्रसंचालन केलेले अनेक रेडिओ शो प्रसिद्ध झाले. यात प्रामुख्याने सिबाका गीतमाला (पूर्वीचे बिनाका गीतमाला) या कार्यक्रमाचे नाव घ्यावे लागते. हा कार्यक्रम १९५२ पासून मुख्यतः रेडिओ सिलोनवर आणि नंतर विविध भारतीवरून एकूण ४२ वर्षांपेक्षा अधिक काळ गाजला. पुढे ४ वर्षांच्या अंतरानंतर त्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले आणि कोलगेट सिबाका गीतमाला या नावाने २ वर्षांसाठी विविध भारतीच्या राष्ट्रीय नेटवर्कवर प्रसारित करण्यात आले होते.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

अमीन सयानी यांचे काही यशस्वी आंतरराष्ट्रीय रेडिओ शोही झाले होते. “मिनी इन्सर्शन्स ऑफ फिल्मस्टार्स” या शोचे यूकेमधील ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या एथनिक नेटवर्कवर ३५ भाग, तसेच “म्युझिक फॉर–मिलियंस”, बीबीसीच्या वर्ल्ड सर्व्हिस रेडिओसाठी ६ भाग, “वीती का हंगामा” सनराईज रेडिओवर लंडन साडेचार वर्षे, असे आंतरराष्ट्रीय रेडिओ शो त्यांनी केले आहेत.

२००८ मध्ये अमीन सयानी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय अमीन सयानी हे अनेक पुरस्कारांचे मानकरी देखील होते. लूपफेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीकडून लिव्हिंग लिजेंड अवॉर्ड (2006), इंडिया रेडिओ फोरमसह अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आला होता. आजही सयानी यांच्या उद्घोषाचे सर्वात जास्त अनुकरण केले जाते.

Tags

follow us