Download App

Bigg Boss Marathi : छोट्या पडद्यावर रितेश भाऊचं राज्य! ‘बिग बॉस मराठी 5’चा नवा विक्रम….

Bigg Boss Marathi: नव्या सीझनमधील रितेश भाऊची लयभारी स्टाईल, नाविन्य, तरुणपण, अनोखा कल्ला या गोष्टी सीझनचा विक्रम रचण्यात कारणीभूत ठरला आहे.

  • Written By: Last Updated:

Riteish Deshmukh New Record Bigg Boss Marathi 5: कलर्स मराठी’ वाहिनीवर (Bigg Boss Marathi 5) ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन नव्या ढंगात, नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या सीझनने अल्पावधीतच रेकॉर्ड ब्रेक करायला सुरुवात केली आहे. (New Record) ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा मंच रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) दणाणून सोडला आहे. नव्या (Bigg Boss Marathi ) सीझनमधील रितेश भाऊची लयभारी स्टाईल, नाविन्य, तरुणपण, अनोखा कल्ला या सर्वच गोष्टी सीझनचा विक्रम रचण्यात कारणीभूत ठरला आहे.


ग्रँड प्रीमियरपासून सुरू झालेली ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. लहान मुलं, महिलावर्ग ते आबाल वृद्ध अशा सर्वांनाच ‘बिग बॉस मराठी’ने वेड लावलं आहे. ‘बिग बॉस मराठी’ची आणि रितेश भाऊच्या कमाल होस्टिंगची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. रितेशच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड्स तोडल्याचे दिसत आहेत.

‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या शनिवारच्या भाऊच्या धक्क्याला 3.7 रेटिंग मिळाले असून रविवारच्या अक्षय कुमार स्पेशल भाऊच्या धक्क्याला 4.0 रेटिंग मिळाले आहे. एकंदरीतच ‘भाऊच्या धक्क्याला’ 3.9 एव्हरेज रेटिंग मिळाले आहे. ‘बिग बॉस मराठी’ने संपूर्ण आठवडा गाजवला आहे. खरंतर ‘बिग बॉस मराठी’ने स्वत:चाच अनोखा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. इतर मराठी वाहिन्यांवरील कथाबाह्य कार्यक्रमांना मागे टाकत ‘बिग बॉस मराठी’ने इतिहास रचला असल्याचे पाहायला मिळत आहे….!

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात, ‘जिथं अत्याचार होणार तिथं सूरज उभा राहणार

‘बिग बॉस मराठी’चं बिगुल वाजलं आणि नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात झाली. महाराष्ट्रातील घराघरांत रात्री 9 च्या ठोक्याला ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन पाहिला जातो. कॉलेजच्या कट्ट्यापासून ते कार्पोरेट ऑफिसपर्यंत सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’बद्दल चर्चा होताना दिसून येते. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनसोबत नवी पिढी जोडली जात आहे.

follow us