Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात, ‘जिथं अत्याचार होणार तिथं सूरज उभा राहणार’

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात, ‘जिथं अत्याचार होणार तिथं सूरज उभा राहणार’

Bigg Boss Marathi New Season Day 26 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होऊन 25 दिवस पूर्ण झाले आहेत. (Bigg Boss Marathi New Season ) सीझन सुरू झाल्यापासूनचा प्रत्येक दिवस हा खूप खास आहे. (Bigg Boss Marathi) प्रत्येक सदस्याने आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. गोलीगत सूरज चव्हाण सुरुवातीला खूप शांत होता. पण आता हळूहळू त्याला ‘बिग बॉस मराठी’चा खेळ कळू लागला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जिथे चुकीचं होणार तिथे सूरज चव्हाण (Suraj Chavan) उभा राहणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. (Bigg Boss Marathi New Promo) या प्रोमोमध्ये सूरज चव्हाण अभिजीत सावंत (Abhijit Sawant) आणि आर्या जाधवला (Arya Jadhav) म्हणत आहे, “जिथे अत्याचार होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहणार… बोलत नाहीना म्हणून ते असा गरीबांचा फायदा घेतात. निक्कीने केलं की आपण ते सहन करायचं? आणि तेच आर्याने केलं तर? आपल्या ग्रुपमधलं कोणीही असो त्याला पाठिंबा द्यायचा म्हणजे द्यायचा..तू नड”.

‘बिग बॉस’ खतरनाक आहेत : अरबाज पटेल

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात अरबाज पटेल म्हणत आहे,”बिग बॉस’ खतरनाक आहेत. माझ्या कॅप्टनसीमध्ये डिलेमा दिलाय त्यांनी. कॅप्टनसी बरोबर सुरू होती. इम्युनिटी हा सर्वात मोठा प्रश्न होता. या इंडस्ट्रीत मी नवीन आहे”. त्यावर अंकिता म्हणते,”मला प्रामाणिकपणे तुझा खेळ वीक वाटत नाही. मला वैभवचा खेळ वीक वाटतो”.

Bigg Boss Marathi : जान्हवीसाठी नवरा मैदानात; पोस्ट करत म्हणाले, ‘ती चुकली पण…’

‘बिग बॉस मराठी’च्या घरात पार पडणार नॉमिनेशन टास्क

‘बिग बॉस मराठी’चा आजचा नॉमिनेशन कार्याचा प्रोमो समोर आला आहे. (Bigg Boss Marathi New Promo) या प्रोमोमध्ये, सदस्य आपल्या गळ्यातील फोटो चुलीत टाकून योग्य कारण देत नॉमिनेट करताना पाहायला मिळत आहेत. जान्हवीने आर्याचा फोटो गळ्यात टाकला असून ती म्हणतेय,”हिचा फोटो गळ्यात टाकून फिरण्याची माझ्यावर वेळ आली आहे”. दरम्यान पॅडी अरबाजला म्हणतोय, “कॅप्टन झाल्यानंतरच सगळे नियम लक्षात येतात”. तर अभिजीत म्हणतोय,”चुकीचं करतोयस…आज नाहीतर उद्या तुला हे भोगावंच लागणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून आतापर्यंत पुरुषोत्तम पाटील (Purushottam Patil), योगिता चव्हाण (Yogita Chavan) आणि निखिल दामले (Nikhil Damle) हे सदस्य बाहेर पडले आहेत. या आठवड्यात कोण बाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासाठीच घरात नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube