Riteish Deshmukh, Genelia D’Souza: बॉलिवूड आणि मराठी चित्रपटातील अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा (Genelia D’Souza) हे दोघे सोशल मीडियावर (Social media) अनेक पोस्ट शेअर करत असतात. रितेश आणि जिनिलियाच्या या सोशल मीडियावरील व्हिडीओला चाहते मोठ्या प्रमाणात नेहमीच पसंती देत असतात.
नुकताच जिनिलिया आणि रितेश यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जिनिलिया आणि रितेश यांचा काही खास अंदाज चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आवडला आहे. रितेश आणि जिनिलिया यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत ते दोघे कॉमेडी डायलॉगवर अक्टिग करताना दिसली आहे.तसेच या व्हिडीओच्या अगोदरच ‘मुझे पता है तुम मेरे बारे में बुरा सोचती हो’ हा डायलॉग ऐकू येतो.
या डायलॉगवर ‘बुरा? तुम्हारे बारे में सोचता कौन है?’ असा रिप्लाय जिनिलिया हिने रितेश देशमुखला अक्टिग केली आहे. या व्हिडीओला जिनिलियाने कॅप्शन देखील दिले आहे, ‘माझ्या नवराची मी Awesome बायको आहे- True story’ रितेश आणि जिनिलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Brahmastra : ‘ब्रह्मास्त्र २’ अन् ३, ‘या’ वर्षी होणार रिलीज, पोस्ट शेअर करत दिग्दर्शकाचा खुलासा
चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस
रितेश आणि जिनिलिया यांच्या या व्हिडीओला अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहे. एका चाहत्यांनी या व्हिडीओला कमेंट केली, ‘परफेक्ट बॉलिवूड कपल’ तर दुसऱ्या युझरनं या व्हिडीओला कमेंट केली, ‘वर्ल्ड बेस्ट जोडी’ जिनिलिया आणि रितेश देशमुख यांनी 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न बंधनात अडकले. दोघांनी 2003 मध्ये आलेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून पदार्पण केले.
या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यावर दोघांनी लग्न केले. जिनिलिया आणि रितेश यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट चाहत्यांना लक्ष वेधतात. गेल्या काही दिवसांअगोदर जिनिलिया आणि रितेश यांचा वेड हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीस आला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिल्याने हा चित्रपट हिट देखील झाला. या चित्रपटामधील रितेश आणि जिनिलिया यांच्या केमिस्ट्रीला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली.