Download App

मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी Riteish Deshmukh पोहोचला जामियात; सेटवरचा ‘तो’ लूक व्हायरल

Riteish Deshmukh In Jamia Millia Islamia : मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय सर्व चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) नुकताच राजधानी दिल्लीतील सेंट्रल युनिव्हर्सिटी जामिया मिलिया इस्लामियामध्ये स्पॉट झाला आहे. रितेश सध्या जामिया मिलिया इस्लामियामध्ये (Jamia Millia Isliamia) त्याच्या आगामी मराठी सिनेमाचे शूटिंग करत आहे. सेटवरील त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media) जोरदार व्हायरल होत आहेत.

रितेश देशमुखच्या आगामी सिनेमातील त्याचा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, रितेश काही पोलिसांबरोबर जामिया मिलिया इस्लामियामधील अभियांत्रिकी विभागाच्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाबाहेर उभा असल्याचे सांगितले जात आहे. तसेच काही मुलीदेखील हाहात संहिता घेऊन उभ्या असलेल्या दिसत आहेत.

रितेश देशमुखच्या आगामी सिनेमाचा लूक समोर आला आहे. या फोटोमध्ये रितेशचा कॉमन मॅन लूक चाहत्यांना बघायला मिळाला आहे. सर्वसामान्य माणसांप्रमाणे त्याने साधं शर्ट आणि पॅन्ट परिधान केले असल्याचे दिसून आला आहे. तसेच त्याच्या खांद्यावर ऑफिस बॅगदेखील आहे. लीक झालेल्या व्हिडीओमध्ये रितेश देशमुखच्या बाजूला अनेक पोलीस उभे असल्याचे देखील दिसत आहे. रितेश देशमुख सध्या सिनेमाच्या शूटिंगसाठी जामिया मिलिया इस्मामियामध्ये आल्याचं सांगण्यात येत आहे.

Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन

विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, रितेशच्या आगामी सिनेमाचं शूटिंग विद्यापीठातील अनेक विभागात होत आहे. विद्यापाठातील वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगसाठी खास सेटअप करण्यात आला आहे. रितेश देशमुखचा ‘वेड’ हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार गल्ला कमावला होता. या सिनेमात तो पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखसोबत झळकला होता. आता रितेशच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.

Tags

follow us