Download App

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात फक्त रिअॅलिटी चालते’, रितेश देशमुखने थेट सुनावलं

Bigg Boss Marathi New Season Day 35 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात दर (Bigg Boss Marathi)आठवड्याला नवा खेळ आणि नवी समीकरणं पाहायला मिळतात.

Bigg Boss Marathi New Season Day 35 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दर (Bigg Boss Marathi)आठवड्याला नवा खेळ आणि नवी समीकरणं पाहायला मिळतात. येणाऱ्या ट्विस्टमुळे अनेकांचा खेळ बदलला. (Bigg Boss Marathi New Season) आठवड्यात काहींचा तोंडावरचा ताबा सुटला. (Bigg Boss Marathi New Promo) दोन सदस्य विरोधात इतर सदस्य असं इक्वेशन आठवडाभर पाहायला मिळालं. आज ‘भाऊच्या धक्क्या’वर या बदललेल्या इक्वेशनवर चर्चा होणार आहे. भाऊच्या धक्क्यावर बिग बॉस मराठीच्या घरात फक्त रिअॅलिटी चालते, असं म्हणत रितेश भाऊ (Riteish Deshmukh) अरबाजची कानउघडणी घेताना दिसणार आहे.


बिग बॉस मराठीच्या या आठवड्यात जोडीचा मामला होता. ‘बिग बॉस’ने घरात जोड्या पाडल्या होत्या. निक्की आणि अभिजीतची एक जोडी होती. दोन जणांना 10 सदस्य टार्गेट करताना दिसून आले. अरबाजने निक्कीविरोधात बोलायला सुरुवात केली आणि दुष्मन का दुष्मन दोस्त म्हणत अरबाज सर्वांनाच आवडू लागला. अरबाजच्या आतापर्यंतच्या चुकांकडे घरातील सदस्यांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे रितेश भाऊ आज भाऊच्या धक्क्यावर याबद्दल बोलताना दिसणार आहे.

भाऊच्या धक्क्यावर आज रितेश भाऊ अरबाजला निक्कीने अभिजीतसोबत केलेली कोणती गोष्ट आवडली नाही? हा प्रश्न विचारणार आहे. त्यानंतर अरबाजचं उत्तर जाणून घेतल्यानंतर रितेश भाऊ त्याला भाऊच्या चक्रव्युहात घेऊन जाणार आहे. रितेश म्हणतोय,”तुम्ही निक्कीच्या बाजूने आहात..त्यांच्या फेव्हरमध्येच आहात हेच मी आता दाखवणार आहे. अरबाज तुम्ही रिअॅलिटी शो केले आहेत. पण हा ‘बिग बॉस मराठी’ आहे. इथे फक्त रिअॅलिटी चालते”. सगळ्यांना सत्य कळल्यासाठी भाऊच्या धक्क्यावर रितेशने चक्रव्युहू रूम उघडली आहे.

Bigg Boss Marathi: रितेश भाऊ सगळ्यांचाच हिशोब करणार चुकता; पाहा भाऊचा धक्का न चुकता

रितेश भाऊ सगळ्यांचाच हिशोब करणार चुकता

‘बिग बॉस मराठी’चा हा पाचवा आठवडा चांगलाच गाजला. गेल्या आठवड्यात रितेश भाऊंनी चक्रव्ह्यू दाखवल्यानंतर काही नात्यांची चक्र गरागर फिरली. जोड्यांच्या बेडीत सदस्य बांधले गेले. काही जोड्या चांगल्या गाजल्या. या आठवड्यात सदस्यांना एक भयचकित धक्का मिळाला. घरात एक रहस्यमय पाहुणा अवतरला. सोन्याची नाणी मिळवताना सदस्यांचा गेम झाला. आता आज भाऊच्या धक्क्यावर सदस्यांची शाळा घेण्यासाठी सज्ज आहे.

‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश भाऊ आज सदस्यांची चांगलीच कानउघडणी करणार आहे. प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणतोय,”बिग बॉस मराठी’च्या घराला भूताने झपाटलं… काहींच्या अंगात जिंकण्याचं वारं भरलं..याच नादात सगळ्यांचं काहीतरी चुकलं. सगळ्यांचाच हिशोब करुयात चुकता.. बघा भाऊचा धक्का न चुकता”.

follow us