दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार; रितेश भाऊंच्या नव्या प्रोमोने महाराष्ट्रात उत्सुकतेचा माहोल

कार्यक्रमाच्या सहाव्या सीझनची हवा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पसरली असताना कार्यक्रमाच्या थीम विषयी नवी कल्पना समोर आली आहे.

News Photo   2025 12 26T102314.033

दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार; रितेश भाऊंच्या नव्या प्रोमोने महाराष्ट्रात उत्सुकतेचा माहोल

दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार या दमदार थीमसोबत रितेश भाऊ (Ritesh) घेऊन आले बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो. कार्यक्रमाच्या सहाव्या सीझनची हवा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पसरली असताना कार्यक्रमाच्या थीम विषयी कल्पना देणारा आणि मूड सेट करणारा बहुप्रतिक्षित प्रोमो समोर आला आहे. त्यावरून प्रेक्षकांनी अनेक अंदाज बांधायला सुरुवात केले असून यंदाचा खेळ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून सदस्यांचे नशिब बदलणारा असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

“फॅन्सचा जीव जडला, की ते पाठ नाही सोडत… आणि आपण शब्द दिला की मागे नाही हटत…” अशा कडक शब्दांत रितेश भाऊंनी या सीझनचा बार उडवला आहे. नक्की दारा पलीकडे काय ट्विस्ट असणार? ? सदस्यांना हे सगळं कसं नव्या पेचात टाकणार? कोण होणार पास तर कोण होणार फेल? या सगळ्याची उत्तरं दार उघडल्यावरच मिळणार आहेत. पहा बिग बॉस मराठी सिझन ६, ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वाजता आपल्या लाडक्या कलर्स मराठी आणि JioHotstar वर.

एन.डी.स्टुडिओत कार्निव्हलला थाटात सुरुवात ; विशेष मुलांच्या हस्ते उद्घाटन

प्रोमो रिलीज होताच त्याचं प्रमुख आकर्षण ठरतंय रितेश भाऊंचे कोड्यातून गेम व घराची थीम सांगणारे प्रभावी संवाद. प्रत्येक प्रोमोमध्ये रितेश भाऊ प्रेक्षकांना काहीतरी नवं देतच असतात. कधी सरप्राइझ, नवा लूक, वेगळी स्टाईल, खास स्वॅग हे त्यांच्या प्रोमोचं कायमचं वैशिष्ट्य राहिलं आहे. यंदाही तसंच काहीसं घडले आहे. या प्रोमोमध्ये यंदाच्या सीझनची थीम वेगळ्या पद्धतीतून प्रेक्षकांसमोर आणण्याकरीता भाऊ आपल्या एका हटके लूकमध्ये दिसत आहे.

या सिझनची टॅगलाईन “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” सुद्धा प्रभावीप्रमाणे प्रेक्षकांन समोर आणली आहे. या सिझनचा खेळ महाराष्ट्राला खिळवून ठेवणार हे नक्की. “ह्याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ” भाऊंच्या ओळी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होणार यात वाद नाही. रितेश भाऊंचा कडक अंदाज, प्रोमोमधील संवाद यंदाच्या सिझनचा ‘मूड सेटर’ करणारे आहेत.

घराची भव्य रचना, शेकडो दारखिडक्यांनी सजलाय घराचा जंगी थाट..दारापल्याडचं surprise…..ठरवेल प्रत्येकाची वाट; यामुळे प्रत्येक क्षणी खेळाचा डाव बदलू शकतो, असा ठाम इशारा हा प्रोमो देतो. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्र प्रचंड आतुरतेने या नव्या सिझनची वाट पाहतोय. घर नक्की कसं दिसणार? नक्की काय सरप्राइझेस असणार? आणि क्षणात डाव कसा बदलणार? हे प्रश्न सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

Exit mobile version