Bigg Boss Marathi 5 Promo: सर्वांना ज्या घोषणेची आतुरता होती अखेर ती आता झाली आहे. हो, नुकतचं ‘मराठी बिग बॉस’च्या पाचव्या सीझनची घोषणा करण्यात आली असून, या पर्वात सूत्रसंचालन कोण करणार, हे देखील समोर आले आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा पहिला टीझर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये महेश मांजरेकर नाही तर बॉलीवूड (Bollywood) अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यंदा बिग बॉसच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना पाहायला मिळणार आहे.
नुकतचं ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘बिग बॉस मराठी 5’चा टीझर शेअर करण्यात आला असून, या टीझर व्हिडीओमध्ये सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख ‘बिग बॉस’च्या अंदाजात दिसला आहे. सोबतच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, ‘मराठी मनोरंजनाचा“BIGG BOSS”… सर्वांना”वेड”लावायला येतोय…“लयभारी”होस्ट,सुपरस्टार रितेश देशमुख!! फक्त कलर्स मराठीवर आणि@officialjiocinemaवर’ असं म्हणण्यात आलं आहे.
कलर्स मराठी आणि जिओ सिनेमाच्या (JioCinema) अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर “बिग बॉस मराठी” चा व्हिडिओ शेयर केला आला असून त्यामध्ये बिग बॉसचा डोळा त्याच सोबत बॅालीवूडचा स्टयलिश हिरो आणि महाराष्ट्राचा मराठमोळा मुलगा सुपरस्टार रितेश देशमुख देखील दिसत आहे. या नव्या सिझनचे हे नवे सरप्राईज असणार असून या सिझनमध्ये एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
बॉलीवूड मधल्या अफाट यशानंतर ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. “बिग बॉस मराठी”चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला. प्रेक्षक या कार्यक्रमावर बेहद फिदा झाले. “बिग बॉस मराठी” च्या पहिल्या चार सिझनने मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकली आणि मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जोरदार चर्चा झाली. आता त्याच ‘बिग बॅास’ मराठीच्या नव्या सिझनची जोरात तयारी सुरू झालीय.
फक्त २७० लोक, 5 डॉलरचं तिकीट अन् १२ पुरस्कार.. वाचा, ‘ऑस्कर’चा खास इतिहास
बिग बॅासचे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये बिग बॅासच्या या घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.