फक्त २७० लोक, 5 डॉलरचं तिकीट अन् १२ पुरस्कार.. वाचा, ‘ऑस्कर’चा खास इतिहास

फक्त २७० लोक, 5 डॉलरचं तिकीट अन् १२ पुरस्कार.. वाचा, ‘ऑस्कर’चा खास इतिहास

Oscar Award History : फिल्मी जगताचा मुद्दा असेल आणि त्यात ऑस्कर पुरस्कार नसेल असे होऊ शकत नाही. चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेते, दिग्दर्शकांचं स्वप्नच असतं की एकदा तरी हा पुरस्कार मिळाला पाहिजे. यासाठी त्यांच्याकडून दिवस रात्र मेहनत घेतली जाते. याचाच परिणाम म्हणून आज अशा कित्येक प्रेरणादायी चित्रपटांची निर्मिती झाली आहे. यातील काही चित्रपट असे आहेत जे आपल्याला विचार करण्यास भर पाडतात. ऑस्कर अवॉर्ड ‘अकॅडमी अवॉर्ड ऑफ मेरिट’ किंवा ‘अकॅडमी अवॉर्ड’ या नावानेही ओळखला जातो. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दरवर्षी केले जाते. यामध्ये निर्देशक, निर्माते, अभिनेते आणि चित्रपटांना पुरस्कार दिला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का या पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती.

९५ वर्षांपूर्वी मिळाला पहिला ऑस्कर

आताच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचा झगमगाट तुम्ही पाहिला असेलच पण पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा असा अजिबात नव्हता. ऑस्कर पुरस्कार सोहळा सर्वात आधी 16 मे 1929 रोजी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये फक्त 270 लोक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन रुजवेल्ट हॉटेलमधील ब्लॉसम रूममध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फक्त 5 डॉलर किमतीचे तिकीट दर निश्चित करण्यात आले होते. या सोहळ्याला डग्लस फेयरबँक्सने होस्ट केले होते.

Oscar 2024: एकदा नाही तर दोनदा जिंकला राजामौलीच्या ‘RRR’ने ऑस्कर, मोडला मोठा रेकॉर्ड

पहिल्या वर्षात फक्त १२ पुरस्कार

आताचा ऑस्कर अवॉर्ड सोहळा तासनतास सुरू राहतो. यामध्ये जगभरातील चित्रपट दिग्दर्शक, निर्देशक आणि अभिनेते हजर असतात. पण पहिला ऑस्कर अवॉर्ड कार्यक्रम फक्त 15 मिनिटात आटोपला होता. यावेळी देण्यात आलेल्या ऑस्कर पुरस्कारांची संख्या सुद्धा अतिशय कमी होती. यावेळी फक्त 12 पुरस्कार आणि प्रमाणपत्र देण्यात आले होते. इतकेच नाही तर ऑस्कर विजेत्यांची नावं या कार्यक्रमाच्या तीन महिने आधीच जाहीर करण्यात आली होती.

एमिल जेनिंग्ज पहिल्या पुरस्काराचे मानकरी

सर्वात पहिला ऑस्कर अवॉर्ड एमिल जेनिंग्ज या जर्मन अभिनेत्याला बेस्ट अक्टर या श्रेणीत मिळाला होता. ‘द वे ऑफ ऑल फ्लेश’ आणि ‘द लास्ट कमांड’ या चित्रपटांतील अभिनयासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. हे दोन्ही चित्रपट हॉलिवूडचे होते. यानंतर जेनिंग्जने पुन्हा जर्मन चित्रपटांत अभिनय करण्यास प्राधान्य दिले होते.

विंग्स पहिला ऑस्कर विजेता सिनेमा

जेनेट गेनोर या अभिनेत्रीला पाहिला ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या श्रेणीत मिळाला होता. ‘सेवेंथ हेवन’, ‘स्ट्रीट एंजल’ आणि सनराइज चित्रपटांतील अभिनयासाठी मिळाला होता. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार ‘विंग्स’ या चित्रपटाला मिळाला होता.

Oscar 2024 : ऑस्कर पुरस्कारांमध्ये ओपेनहायमरचा दबदबा, सिलियन मर्फी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज