Download App

Rohit Saraf: रोहित सराफने प्रेक्षकांना दिली नव्या प्रोजेक्ट्बद्दल हिंट

Rohit Saraf: आजवर अनेक वेब सिरीजनी चाहत्यांच्या मनावर मोहिनी घालण्याचं काम केलं आहे. ‘मिसमॅच’ ही त्यापैकीच एक वेब सिरीज आहे. याचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या रिलीज होणार आहे. नाट्यमय घडामोडींचा समावेश असलेल्या ‘मिसमॅच 3′( Mismatched 3) मध्ये प्रेम, मैत्री आणि स्वत्वाचा शोध घेणारं कथानक पाहायला मिळणार आहे. यामध्ये रोहित सराफ (Rohit Saraf) आणि प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) ही जोडी हटक्या अंदाजात दिसणार आहे. दोघांनी साकारलेले ऋषी आणि डिम्पल पुन्हा प्रेक्षकांना खुणावणार आहेत.

आता त्याचा आगामी प्रोजेक्टबद्दल आणखी एक खास गोष्ट सांगितली आहे. आघाडीचा आठवडा Exciting आहे, अश्या कॅप्शनसह मिरर सेल्फी टाकून त्याने या नव्या आगामी भूमिकेची एक झलक दिली आहे. या वेब सिरीजचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झाल्याचं सोशल मीडियाद्वारे सांगण्यात आले आहे. आकर्ष खुराणा आणि निपुण धर्माधिकारी यांनी ‘मिसमॅच 3’चं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. आधुनिक नातेसंबंधांच्या गुंतागुंतीतून मार्ग काढणारी ही वेब सिरीज संस्कृती-परंपरा, सहचर्य आणि वैयक्तिक उत्क्रांती यावर भाष्य करणारी आहे. या वर्षाच्या उत्तरार्धात ‘मिसमॅच 3’ रिलीज होणार असल्याची हिंट दिली आहे.

Nargis Fakhri: …म्हणून अभिनेत्री नरगिस फाखरी स्वतः ला वॉटर बेबी म्हणते

प्राजक्ता आणि रोहित दोघेही मनोरंजनसृष्टीत आपली अनोखी छाप पाडण्यात व्यग्र आहेत. प्राजक्ताने अलीकडेच 2022 मध्ये वरुण धवन आणि कियारा अडवाणी स्टारर ‘जुग जुग जीयो’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आणि नंतर जुलै 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या विद्या बालनच्या नियतमध्ये ती पाहायला मिळाली आहे.

दरम्यान, रोहितचा आगामी प्रोजेक्ट विक्रम वेधा होता. यामध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत होते. मिसमॅच्ड सीझन 3 चे शूटिंग आता पूर्ण झाले आहे. यात रोहित व्यतिरिक्त पश्मिना रोशन, जिब्रान खान आणि नायला ग्रेवाल देखील पाहायला मिळणार आहेत. चाहते रोहितच्या ‘मिसमॅच्ड 3’ ची वाट पाहू शकत नसले तरी ते ‘इश्क विश्क रिबाउंड’ चीही वाट पाहत आहेत ज्यामध्ये अभिनेता पुन्हा एकदा मनोरंजन करणार आहे.

follow us

वेब स्टोरीज