Download App

Rohit Saraf : ठरलं तर! मिसमॅच्ड 3 लवकरच येणार, रोहितने दिली खुशखबर

  • Written By: Last Updated:

Rohit Saraf : मिसमॅच्ड सीझन3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रोहित सराफने (Rohit Saraf ) या सीरिजचा पहिला फोटो पोस्ट करून चाहत्यांना खुशखबर दिली आहे. लवकरच मिसमॅच्ड 3 येणार असल्याची एक झलक दाखवली आहे. चर्चेत असलेल्या या वेब सीरिज साठी सगळेच उत्सुक असताना आता याचा तिसरा सीजन येणार असल्याचं कळतंय.

हार्दिक पांड्याची अट अन् रोहितची विकेट, पडद्यामागील सत्य आले बाहेर

रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळी या कलाकारांनी चाहत्यांना पुढच्या सीजन येणार असल्याची एक झलक दाखवली आहे. दिग्दर्शक आकर्ष शर्मासह या तिघांनी एक खास फोटो सोशल मीडिया वर शेयर केला असून आता लवकरच मिसमॅच्ड 3 चा सीजन येणार आहे.चाहत्यांची आवडती वेब सीरिज मिसमॅच्ड 3 ही सुरुवातीपासूनच चर्चेत असलेली सीरिज आहे. सुरुवातीच्या दोन सीझनमध्ये रोहित सराफचे पात्र ऋषी सिंग शेखावत याने प्रेक्षकांना आपलंसं केल आहे. रोमान्स आणि विनोद यांचा अनोखा अंदाज यातून अनुभवयाला मिळाला होता.

Uddhav Thackeray : तुम्ही अदानींचे बूट का चाटताय? उद्धव ठाकरेंचा सरकारला खोचक सवाल

सीझन 3 ची उत्सुकता बघायला मिळत असून हास्य, प्रेम आणि अप्रत्याशित ट्विस्टने भरलेल्या मिसमॅच्डच्या मनमोहक दुनियेत पुन्हा प्रवेश करण्यास सगळेच उत्सुक आहेत. नॅशनल क्रश असलेला रोहित सराफ (Rohit Saraf) हा नेहमीच त्याच्या फॅशन लूक्सने सगळ्यांची मन जिंकून घेत असतो.

रोहितचे लूक्स हे कायम प्रेक्षकांना मोहित करतात आणि त्याने एक फॅशन आयकॉन म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मिसमॅच्ड 3 या वेबसिरीजमध्ये अभिनेता ऋषी सिंग शेखावत ही त्याची लाडकी व्यक्तिरेखा पुन्हा साकारणार आहे आणि तो 2003 च्या कल्ट क्लासिक इश्क विश्कचा सिक्वेल असलेल्या इश्क विश्क रिबाउंडवरही काम करत आहे.

follow us

वेब स्टोरीज