हार्दिक पांड्याची अट अन् रोहितची विकेट, पडद्यामागील सत्य आले बाहेर

हार्दिक पांड्याची अट अन् रोहितची विकेट, पडद्यामागील सत्य आले बाहेर

Hardik Pandya : आयपीएलचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार असून या लिलावापूर्वी एका बातमीने मोठी खळबळ उडाली आहे ती म्हणजे मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार बनवले आहे. मुंबई इंडियन्सने नुकतेच हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले होते आणि तेव्हापासूनच त्याच्याकडे कर्णधार जाईल, असे मानले जात होते, पण यंदाच्या हंगामापासून हा बदल होईल, असे कोणालाच वाटले नव्हते.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने गेल्या दोन हंगामात दमदार कामगिरी केली होती. पहिल्या हंगामातच या संघाने विजेतेपद पटकावले होते, मात्र दुसऱ्या हंगामात संघाचा अंतिम फेरीत पराभव झाला होता.

रोहित शर्मा हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यापासून चाहत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. एका रिपोर्टनुसार की, रोहित शर्माला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदातील बदलाची माहिती देण्यात आली होती.

कसोटी क्रिकेटमध्ये महिला संघाने रचला इतिहास, दीप्ती शर्माची घातक गोलंदाजी

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास तयार आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, रोहित शर्माला वर्ल्ड कपच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सने सांगितले होते की हार्दिक पांड्या संघात पुनरागमन करत आहे, पण कर्णधार म्हणून. हार्दिक पांड्याने गुजरातमधून मुंबईत येण्यास एका अटीवर होकार दिला होता की त्याला टीमचे कर्णधारपद हवे आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला डबल झटका; शमी, चहर आऊट

रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनामध्ये अनेक बैठका झाल्या. यामध्ये त्याला कर्णधारपदावरुन हटवणे आवश्यक असल्याचे रोहितला आले होते. यानंतर रोहितने आगामी हंगामात पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याला सहमती दर्शवली. रोहित शर्माने टीमच्या भवितव्याचा निर्णय व्यवस्थापनावर सोडला होता.

मुंबई इंडियन्सने शुक्रवारी IPL 2024 पूर्वी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिकने रोहित शर्माची जागा घेतली आहे. कर्णधार बदलाच्या घोषणेनंतर मुंबई इंडियन्सने रोहित शर्मासाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्टही टाकली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube