Download App

अभिनेता रोनित रॉय वयाच्या 58व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहल्यावर! कोणासोबत थाटला संसार?

Ronit Roy Wedding :अभिनेता रोनित रॉय (Ronit Roy) सध्या त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे जोरदार चर्चेत आला आहे. (Ronit Roy Marriage) रोनितने त्याची पत्नी नीलम बोस रॉयसोबतच (Neelam Bose Roy) पुन्हा एकदा बोहल्यावर चढला आहे. लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या जोडप्याने हिंदू रितीरिवाजांनुसार शाही विवाह केले आहे. रोनित आणि नीलम यांचे 2003 साली लग्न झाले आणि आता ते पुन्हा एकदा तो आनंदाचा क्षण जगत आहेत.


रोनितने आपल्या लग्नाचे सुंदर फोटो (Photos) आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये रोनित आणि त्याची पत्नी नीलम लिप लॉक करताना दिसत आहेत. जे चाहत्यांना खूप आवडले आहे. या लग्नाचे चाहते खूप कौतुक करत आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की, लग्नानंतर काही वर्षांतच लोक घटस्फोट घेतात आणि रोनित 20 वर्षांनंतर आपल्या पत्नीशी पुन्हा लग्न करत आहे.

पहिल्या व्हिडीओमध्ये नीलम हातात माला घेऊन उभी आहे आणि पंडित कापड धरून आहे आणि त्या कपड्याच्या दुसऱ्या बाजूला रोनित माला घेऊन उभा आहे. कॅप्शनमध्ये रोनितने लिहिले आहे की, “तू माझ्याशी पुन्हा लग्न करशील का?” यानंतर, रोनितने फेरीच्या वेळेचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले आहे की, “आमच्या वचनांचे पुन्हा एकदा नूतनीकरण करत आहोत.

 

रोनितने शेवटी एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये त्याचे लग्न करताना, आशीर्वाद घेताना आणि किस करतानाचे काही फोटो आहेत. लग्नात रोनितने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा तर नीलमने लाल रंगाचा सूट घातला आहे. लग्नाच्या कपड्यांमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. दोघांचेही लिप लॉकिंगचे फोटोची जोरदार चर्चा होत आहे.

Tags

follow us