Randeep Hooda Marriage: मणिपुरी अंदाजात रणदीप हुड्डा अडकला लग्नबंधनात; फोटो व्हायरल…

Randeep Hooda Marriage: मणिपुरी अंदाजात रणदीप हुड्डा अडकला लग्नबंधनात; फोटो व्हायरल…

Randeep Hooda Lin Laishram Wedding : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आणि त्याची गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत (Lin Laishram) बोहल्यावर चढला आहे. मणिपूरमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. त्यांचे विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत आहेत. मणिपूरमध्ये पारंपारिक पद्धतीत ते विवाहबंधनात अडकले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)


रणदीप-लिनच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. लग्नात रणदीपने पांढऱ्या रंगाची धोती आणि कुर्ता परिधान केला आहे. तर लिन मणिपूर स्टाईल आऊटफिटमध्ये बघायला मिळत आहे. लिनचा आऊटफिट खूपच रंजक दिसत आहे. रणदीप हुड्डाने शाही विवाहसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्याने सांगितले आहे की, “फॉर्म टूडे..व्ही आर वन”. या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील त्यावर अभिनंदनाचे कमेंट्स करत आहेत. रणदीप आणि लिनच्या शाही विवाहसोहळ्यातील फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

रणदीप हुड्डा लिनसोबतच्या लव्हस्टोरीबद्दल बोलताना असताना म्हणाला की, “आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमामध्ये झालं आहे. नसीरुद्दीन शाह यांच्या ‘मोटली’ या नाटकाच्या ग्रुपमध्ये आमची पहिली भेट घडून आली होती. मी तिचा सीनियर होतो. अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यावर आम्ही संसार थाटण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यावेळी त्याने दिली आहे

Salaar Trailer: अखेर प्रतीक्षा संपली! प्रभासच्या ‘सालार’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर ‘या’ दिवशी येणार भेटीला

रणदीप-लिनच्या शाही विवाहसोहळ्याला कोणतेही सेलिब्रिटी उपस्थित नव्हते. मणिपूरमध्ये कुटुंबिय आणि मित्र-मंडळींच्या उपस्थित त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. आता मुंबईमध्ये त्यांच्या ग्रँड रिसेप्शनचं मोठं आयोजन करण्यात येणार आहे. या रिसेप्शनला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. रणदीपची गर्लफ्रेंड लिन ही एक लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ओम शांती ओम, जाने जान, रंगून अशा अनेक हिंदी सिनेमांत तिने आपली भूमिका बजावली आहे. लिनअगोदर रणदीपचं नाव सुष्मितासोबत जोडलं गेलं होतं. 2004 ते 2006 मध्ये ते रिलेशनमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube