Devra First Look Release : साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर (Jr NTR) ‘RRR’ नंतर त्याच्या आगामी ‘देवरा’ (Devra Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील अभिनेत्याचा लूक याआधीच रिलीज झाला होता, त्यानंतर चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुकतेने वाट पाहात होते. (New Year 2024)अशा परिस्थितीत आता नवीन वर्ष 2024 च्या सेलिब्रेशनच्या (celebration) निमित्ताने अभिनेत्याने चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. त्याने चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर (social media) शेअर केले आणि शेअर करण्यासोबतच त्याची पहिली झलकही दाखवली आहे. सोबतचं चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
అందరికీ నూతన సంవత్సర శుభాకాంక్షలు! Wishing you all a very Happy New Year.
Can’t wait for you all to experience the glimpse of #Devara on Jan 8th. pic.twitter.com/RIgwmVA6e0
— Jr NTR (@tarak9999) January 1, 2024
ज्युनियर एनटीआरने नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने इंस्टाग्रामवर ‘देवरा’चे नवीन पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये तो समुद्रात बोटीत उभा असल्याचे दिसत आहे. त्यांची एक वेगळी शैली यात पाहायला मिळते. ज्युनियर एनटीआर डॅशिंग आणि अॅक्शन अवतारात दिसाला मिळत आहे. हे पोस्टर शेअर करण्यासोबतच दाक्षिणात्य अभिनेत्याने कॅप्शन लिहिले की, ‘देवराच्या पहिल्या झलकची प्रतीक्षा करू शकत नाही. 8 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. होय, तुम्ही ते बरोबर ऐकले आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हिडिओ 8 जानेवारीला रिलीज होणार आहे. आता ही माहिती समोर आल्यानंतर चाहते या चित्रपटासाठी आणखीनच उत्सुक झाल्याचे दिसत आहेत.
‘देवरा’ दोन भागात प्रदर्शित होणार: ‘देवरा’च्या रिलीजबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाच्या नवीन पोस्टरवर त्याची रिलीज डेटही लिहिली आहे. हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी जगभरातील बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या दक्षिण अॅक्शन ड्रामा चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबत सैफ अली खान आणि जान्हवी कपूर देखील दिसणार आहेत. या माध्यमातून बॉलिवूडचे दोन्ही स्टार्स प्रथमच ज्युनियर एनटीआरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. सोबतचं जान्हवीचा हा पहिला साऊथ चित्रपट असेल. हे दोन भागात बनवले जात असल्याचे सांगितले जात आहे.
ज्युनियर एनटीआरचा 30वा चित्रपट: ‘देवरा’ हा जूनियर एनटीआरचा 30 वा चित्रपट आहे. त्याचे काही पोस्टर आधीच रिलीज झाले आहेत. यामध्ये सैफ अली खान आणि जान्हवी कपूरचे लूक चित्रपटापूर्वीच रिलीज करण्यात आले आहेत, यामध्ये दोन्ही कलाकार डॅशिंग स्टाईलमध्ये दिसले होते.
शिवाय ज्युनियर एनटीआरच्या शेवटच्या चित्रपटाबद्दल बोललो तर तो शेवटचा ‘RRR’ मध्ये दिसला होता. हा चित्रपट कोरोनाच्या कालावधीनंतर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडले. अशा परिस्थितीत ज्युनियर एनटीआरचा ‘देवरा’ बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. प्रकाश राज यांचीही यात महत्त्वाची भूमिका आहे.