Download App

‘सा रे ग म प’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या पडद्यामागे चाललंय काय?

  • Written By: Last Updated:

Sa Re Ga Ma Pa Little Champs Marathi 2023 : झी मराठी या वाहिनीवरील नावाजलेला कार्यक्रम सा रे ग म प लिटल चॅम्प्स हा 9 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. झी मराठी वाहिनीने याबाबतचा खास व्हिडीओ रिलीज केला आहे. या व्हिडीओमध्ये कार्यक्रमातील परीक्षक तसेच सूत्रसंचालक यांची झलक दिसून येत आहे.

सारेगमप हा कार्यक्रम महाराष्ट्रातील घराघरांत पाहिला जातो. अत्यंत लोकप्रिय असा हा कार्यक्रम आहे. 10 वर्षांपूर्वी सारेगमप  लिटल चॅम्प्स या कार्यक्रमाचा पहिला सीझन लाँच करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या वर्षी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन पार पडला होता. यानंतर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी या कार्यक्रमाचा तिसरा सीझन सादर होत आहे.

Seema Haider : सीमा अन् सचिनच्या रुमनंबर 204 ची स्टोरी, त्या सात दिवसांत काय काय घडले?

त्या आधी एक खास व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कार्यक्रमाच्या शुटींगच्या वेळेसची काही झलक दाखविण्यात आली आहे. सलील कुलकर्णी, वैशाली माडे आणि सुरेश वाडकर हे या पर्वाचे परीक्षक म्हणून काम करणार आहेत. सलील कुलकर्णी यांनी याआधी सारेगमपचे परीक्षक म्हणून काम केले आहे पण सारेगमपची विजेती महागायिका वैशाली पहिल्यांदाच परीक्षण करणार आहे. या पर्वाची आणखी एक खासियत म्हणजे ह्यावर्षी सुरेश वाडकर हे एका खास भूमिकेत बघायला मिळणार आहेत.त्यामुळे यंदाचं हे पर्व नाही तर प्रेक्षकांना सांगीतिक पर्वणी मिळेल यात शंका नाही .हे या पर्वाचे परीक्षक म्हणून काम करणार आहेत. सलील कुलकर्णी यांनी याआधी सारेगमपचे परीक्षक म्हणून काम केले आहे पण सारेगमपची विजेती महागायिका वैशाली पहिल्यांदाच परीक्षण करणार आहे. या पर्वाची आणखी एक खासियत म्हणजे ह्यावर्षी सुरेश वाडकर हे एका खास भूमिकेत बघायला मिळणार आहेत.

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी

या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये परीक्षक सलील कुलकर्णी, वैशाली माडे आणि सुरेश वाडकर यांसह कार्यक्रमाची सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडे यांची झलक या व्हिडीओमध्ये पहायला मिळते आहे. 9 ऑगस्ट 2023 पासून बुधवार ते शनिवार रात्री साडे नऊ वाजता हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे.

Tags

follow us