Seema Haider : सीमा अन् सचिनच्या रुमनंबर 204 ची स्टोरी, त्या सात दिवसांत काय काय घडले?

Seema Haider : सीमा अन् सचिनच्या रुमनंबर 204 ची स्टोरी, त्या सात दिवसांत काय काय घडले?

Seema Haider : गेल्या काही दिवसांपासून पबजी कपल सीमा हैदर आणि सचिन मीना चर्चेत आहे. सीमा हैदरच्या संदर्भात दररोज धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती येत आहे. आता नेपाळची राजधानी काठमांडू येथील रुम नंबर 204 ची स्टोरी समोर आली आहे.

पाकिस्तानमधील सीमा हैदर आणि नोएडा येथील सचिन मीना हे नेपाळची राजधानी काठमांडू येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. दोघेही सात दिवस हॉटेलमध्ये राहिले, त्यानंतर ते टॅक्सीने निघून गेले. सीमा आणि सचिन ज्या हॉटेलमध्ये राहिले त्या हॉटेलच्या रजिस्टरमध्ये या दोघांची नोंद नाही. दोघांची नावे बदलली असावीत, असे हॉटेल व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

सीमा हैदरचे प्रकरण चर्चेत आले तेव्हा सीमा आणि सचिन यांनी पोलिसांना सांगितले होते की ते दोघे काठमांडूमधील हॉटेल न्यू विनायक येथे 7 दिवस थांबले होते. येथील हॉटेल रिसेप्शनिस्ट गणेश रोकमगरने सांगितले की, काठमांडूच्या या भागात अनेक हॉटेल्स आहेत, जी येथे राहणाऱ्या लोकांकडून ओळखपत्र घेत नाहीत, फक्त नाव आणि तपशील नोंदवतात. यानंतर त्यांना हॉटेलमध्ये खोली दिली जाते.

Sholay सिनेमा हा हॉलिवूडमध्ये आला असता तर? एकदा व्हिडीओ पाहाच…  

हॉटेल न्यू विनायकचे रजिस्टरमध्ये सीमा आणि सचिनची नावे नसल्याचे समोर आले आहे. रिसेप्शनिस्ट गणेशचे म्हणणे आहे की स्वत: त्यानेच सीमा आणि सचिनची रूम बुक केली होती. पण हॉटेलच्या रजिस्टरमध्ये सचिनने नाव बदलले असावे, असे रिसेप्शनिस्ट गणेशने सांगितले. सचिन अगोदर आला आणि माझी पत्नीही येणार असल्याचे सांगून रूम बुक केली. त्यानंतर दोघांनी एकत्र राहून अनेक रील केले असे रिसेप्शनिस्ट गणेशने सांगितले.

हॉटेलचा रिसेप्शनिस्ट गणेश म्हणाला की रीलमध्ये पाहिल्याप्रमाणे जोडप्याने या रुममध्येच लग्न केले होते. दोघेही पशुपतीनाथ मंदिरात जात होते. एकदा, सीमाने क्लब आणि पबमध्ये जाण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. तिथं फक्त भारतीय ठग जातात असे हॉटेलवाल्यांनी सांगितल्यानंतर ते गेले नाहीत.

Gujarat Riots : तिस्ता सेटलवाड यांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

सीमा हैदर आणि सचिन मीना हे न्यू विनायक हॉटेलच्या रिसेप्शनिस्ट गणेशच्या कुटुंबाला भेटले होते. त्यांना ती पाकिस्तानी असल्याचा कोणालाही संशय आला नाही. सात दिवस हॉटेलमध्ये असताना सीमाने आपण पाकिस्तानातून आल्याचे कोणालाही सांगितले नाही. सीमा आणि सचिन बहुतेक वेळ हॉटेलच्या खोलीत घालवायचे. त्यानंतर एके दिवशी दोघेही घाईघाईने टॅक्सीने पोखराकडे निघून गेले, असे रिसेप्शनिस्ट गणेशने सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube