Download App

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाचा सुरेश वाडकरांना खोचक टोला; म्हणाले…

Sachin Goswami On Suresh Wadkar: सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) सोमवारी शिर्डीमध्ये साईबाबांचे (Sai Baba Temple) दर्शन घेतले. यावेळी माध्यमांनी त्यांना राजकारण आणि मराठा आरक्षणाबद्दल (Maratha Reservation) काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यावेळी वाडकर यांनी राजकारणाबद्दल मला काहीच माहीत नाही. मी गाणं वाजवणारा माणूस आहे, अशी थेट प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. सध्या मराठा आरक्षणावरुन राज्यामध्ये वातावरण पेटलं आहे. आणि वाडकर यांनी म्हटले की, साईबाबांनीच मोदीजींना प्रधानमंत्रीपदी (PM Modi) बसवलं आहे.

मोदींजी आता सर्वकाही व्यवस्थित करणार आहे. सर्व देवी देवतांनी आणि बाबांनी नरेंद्र मोदी यांची नेमणूक केली. ही नेमणूक फक्त चांगले करण्यासाठी केल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावर आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी (Sachin Goswami) यांनी पोस्ट शेअर करत खोचक टोला लगावला आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी “पुढील ‘महाराष्ट्र भूषण’ (तुजं नमो गायक) सुरेश वाडकर…एक अंदाज.” अशी फेसबुक पोस्ट शेअर करत वाडकरांच्या त्या पोस्टवर खोचक टोला लगावला आहे. यावर आता अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. अगोदर आणि आत्ताची शिर्डीमध्ये खूप मोठा फरक मला जाणवत आहे. मी आधी लक्ष्मीवाडीपासून सायकलवर शिर्डीमध्ये येत होतो. त्यावेळी अनेकवेळा समाधानासाठी मी समाधी समोर बसत असायचो. मात्र आता खूप बदल झाला आहे.

Video: अक्षय अन् टायगरच्या कार्यक्रमात चाहत्यांचा मोठा गोंधळ; पोलिसांकडून लाठीचार्ज

भविकांसाठी अनेक वेगवेगळ्या चांगल्या सुविधा करण्यात आल्या आहेत. भाविकांना आता दर्शनासाठी काही देखील अडचण निर्माण होत नाही. नाशिकला मी नेहमी जात असतो. त्यावेळेस देखील पाहतो की प्रत्येक दोन किलोमीटर एक मंडळ शिर्डीला पायी जात असल्याचे दिसत असतो. गेल्या काही वर्षांनंतर मी पुन्हा एकदा साईच्या दर्शनाला आलो आहे. सहकुटुंब साई समाधीचे दर्शन घेतले. साई संस्थानच्या वतीने वाडकर यांचा सत्कार देखील करण्यात आला. अनेक वर्षांनी येणं झाले आहे. साधारण 1967 पासून मी साईबाबांच्या चरणी येत आहे.

साई दर्शनानंतर मला फक्त रडायला येत आहे. बाबांकडे मी आतापर्यंत काहीच मागितलं नाही. बाबांनी काही देखील न मागता सर्व गोष्टी मला दिले आहेत. दरम्यान, सुरेश वाडकरांना नुकताच 57व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कार CM एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रधान करण्यात आला आहे.

follow us

वेब स्टोरीज